इराणचे आण्विक तळ सुरक्षित?, इस्रायलच्या 100 जेट फायटरने केला होता हल्ला
इराणने 1 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा बदला इस्रायलने तब्बल 25 दिवसानंतर शनिवारी घेतला आहे. शनिवारी इस्रायलच्या100 जेट फायटरने इराणच्या 10 लष्करी तळांवर मोठा हल्ला केला होता.या हल्ल्यात इराणचे आण्विक तळ सुरक्षित राहीले आहेत का ? असा सवाल केला जात आहे.
इराणवर इस्रायलने शनिवारी रात्री सुमारे 100 फायटर जेटद्वारे हल्ला केला होता. या हल्ल्यात इस्रायलने इराणच्या 10 लष्करी केंद्रांना लक्ष्य केले होते. इस्रायलने आपल्यावर 1 ऑक्टोबर रोजी इराणने केलेल्या हल्ल्याचा हा बदला असून तो यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात इराणचे महत्वपूर्ण आण्विक तळांना लक्ष्य केले गेले काय ? असा सवाल केला जात होता. परंतू या संदर्भात जगभरातील न्युक्लीअर प्रोग्रॅमवर लक्ष ठेवणारी संयुक्त राष्ट्र एजन्सीचे (IAEA) स्पष्टीकरण पुढे आले आहे.
राफेल ग्रॉसी यांची एक्सवरील पोस्ट येथे पाहा –
Iran’s nuclear facilities have not been impacted. @IAEAorg inspectors are safe and continue their vital work. I call for prudence and restraint from actions that could jeopardize the safety & security of nuclear & other radioactive materials.
— Rafael MarianoGrossi (@rafaelmgrossi) October 26, 2024
IAEA (International Atomic Energy Agency) चे डायरेक्टर राफेल ग्रॉसी यांनी एक्स वर एक पोस्ट केलेली आहे. आंतरराष्ट्रीय वादाचे कारण असलेला इराणचा अणू कार्यक्रम येथील सुरक्षेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे या संस्थेने म्हटले आहे. याच बरोबर राफेल ग्रॉसी यांनी दोन्ही देशांना शांतता कायम राखण्याचे आवाहन देखील केले आहे.
सॅटेलाईट फोटोतून नुकसानाचा अंदाज
दोन वेगवेगळ्या अमेरिकन रिसर्चर्स संस्थांच्या मते सॅटेलाईट फोटोच्या आधारे इराणवरच्या इस्रायलने केलेल्या ताज्या हल्ल्यात काही इमारतींना हानी पोहचली आहे. ज्याचा वापर इराण बॅलिस्टीक मिसाईलसाठी घन इंधन मिक्स करण्यासाठी करायचा. ही माहिती वॉशिंग्टन थिंक टॅंक CNA डेकर एवेलेथ आणि UN चे अधिकारी डेव्हिड अलब्राईट यांच्यावतीने केले आहे.इस्रायलने इराणची राजधानी तेहराण जवळील एका विशाल सैन्य परिसरात हल्ला केला आहे. इस्रायलने तेहराण जवळील एका क्षेपणास्र तयार करणाऱ्या एका मोठ्या केंद्रावर हल्ला केला असल्याचे डेकर एवेलेथ यांनी म्हटले आहे.
इराणची कबूली
शनिवारी पहाटे इराणच्या सैन्य तळांवर झालेल्या इस्रायलच्या हल्ल्यात किमान चार सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर रडार यंत्रणा क्षतिग्रस्त झाली आहे. आम्ही या हल्ल्याचा ताकदीने प्रतिकार केल्याचे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे.इलाम, खुजिस्तान आणि तेहराण प्रांतातील सैन्य तळांवर हल्ला झाल्याचे इराण हवाई संरक्षण विभागाने म्हटले आहे.