इस्रायलचे PM नेतान्याहू यांना सुरक्षेची सतावतेय चिंता? मुलाचे लग्न पुढे ढकलणार?

इस्रायलच्या पंतप्रधान बेंजामिन नेतान्याह यांना त्यांच्या सुरक्षेची चिंता वाटू लागली आहे. नुकताच त्यांच्या खाजगी निवासस्थानावर ड्रोनचा हल्ला झाला,त्यावेळी सुदैवाने ते घरी नव्हते.

इस्रायलचे PM नेतान्याहू यांना सुरक्षेची सतावतेय चिंता? मुलाचे लग्न पुढे ढकलणार?
Follow us
| Updated on: Oct 30, 2024 | 9:09 PM

Israel PM Son Wedding : इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धाची व्याप्ती वाढतच चालली आहे. आता इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरु झाले आहे. या युद्धात इस्रायलवर देखील मोठे हल्ले झाले आहेत. अलिकडेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या निवासस्थानावर देखील हल्ला झाला होता. या सर्व गोष्टींचा विचार करुन पंतप्रधान नेतान्याहू यांनी त्यांच्या मुलगा अवनर याचा विवाह स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अवनर नेतान्याहू याचा विवाह 26 नोव्हेंबर रोजी तेल अवीवच्या उत्तरेकडील शेरोन क्षेत्रातील रोनित फार्म येथे करण्याची योजना आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी विविध आघाड्यावर युद्ध सुरु केले आहे. अनेक देशांशी एकाच वेळी सुरु असलेले युद्ध आणि ड्रोनपासुनचा धोका पाहाता त्यांचा मुलगा अवनर यांचा विवाह नियोजित तारखेला करु इच्छित नाहीत.

लग्नात सहभागी होणाऱ्यांच्या जीवाला धोका

कॅन पब्लिक ब्रॉडकास्टरने नेतान्याहू यांच्या संदर्भातील वृत्त दिलेले आहे. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की योजनेनुसार विवाहाचा कार्यक्रम आयोजित करणे आणि त्यात सामील होणाऱ्यांसाठी जोखीमेचे होऊ शकते. या वृत्तासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. या महिन्याच्या सुरुवातीला हेजबोल्लाच्या एका ड्रोनने कैसरिया येथे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या खाजगी निवास स्थानाच्या खिडकीवर हल्ला केला होता.त्यात मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी सुदैवाने पंतप्रधान नेतान्याहू घरी नव्हते.

इस्रायलचे सातत्याने हेजबोलावर हल्ले

इस्रायलने गेल्या महिन्यापासून लेबनॉनमध्ये हेजबोलाच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरु केले आहे. ही मोहीम सुरुच आहे. इस्रायलवर हल्ला केल्यानंतर ही मोहीम सुरु झालेली आहे.आता हे युद्ध वाढतच चालले आहे.लेबनॉनच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात 2,700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.तर 12,500 जण जखमी झाले आहेत. या वर्षी 1 ऑक्टोबर रोजी इस्रायलने दक्षिणी लेबनॉन मध्ये घुसखोरी करुन संघर्ष आणखी वाढवला आहे.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.