Russia Moscow Gunfire : गन फायरिंग आणि एकच गदारोळ.. शेकडो जखमी, मॉस्कोतील अतिरेक्यांचे फोटो जारी, जग हादरले

Russia Moscow Gunfire : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये अनेक जण ठार झाले तर शेकडो लोक गंभीर जखमी झाले. याचदरम्यान रशियन मीडियाने दहशतवाद्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. हल्लेखोर 'आशियाई आणि कॉकेशियन' लोकांसारखे दिसत होते आणि ते रशियन नसून परदेशी भाषेत बोलत होते, असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी दहशतवादी हल्ल्याती प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने म्हटले.

Russia Moscow Gunfire : गन फायरिंग आणि एकच गदारोळ.. शेकडो जखमी, मॉस्कोतील अतिरेक्यांचे फोटो जारी, जग हादरले
रशियाची राजधानी मॉस्कोत झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे.
Follow us
| Updated on: Mar 23, 2024 | 10:04 AM

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण जग हादरलं आहे. एका कॉन्सर्ट हॉलमध्ये घुसलेल्या पाच बंदुकधारी अतिरेक्यांनी अंदाधुद गोळीबार केला तसेच स्फोटही करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, मॉस्कोमध्ये झालेल्या या हल्ल्यात आत्तापर्यंत 60हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत तर शेकडो जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया अँड इराक (ISIS) अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची आणि बाँबस्फोटातची जबाबदारी घेतली आहे. ISIS ने त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरून एक निवेदन जारी केले. ‘आमच्या सैनिकांनी रशियाची राजधानी मॉस्कोच्या बाहेरील क्रोकस कॉन्सर्ट हॉलवर हल्ला केला.’ हल्लेखोर ‘त्यांच्या लपलेल्या ठिकाणी सुरक्षितपणे परतले आहेत’, असेही इसिसचने म्हटले आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण जगभरात संतापाचे आणि दु:खाचे वातावरण आहे. या कॉन्सर्ट हॉलमध्ये आणखी काही लोक अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

याचदरम्यान रशियन मीडियाने या हल्ल्यासाठी कारणीभूत ठरलेल्या दहशतवाद्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. हल्लेखोर ‘आशियाई आणि कॉकेशियन’ लोकांसारखे दिसत होते आणि ते रशियन नसून परदेशी भाषेत बोलत होते, असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी दहशतवादी हल्ल्याती प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने म्हटले. हे दहशतवादी मूळचे इंगुशेतियाचा असल्याचा दावा रशियन मीडियाने केला आहे. लष्करी गणवेश घातलेले दहशतवादी इमारतीत घुसले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. जो कोणी समोर दिसत होता त्याच्यावर धडाधड गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर स्फोट झाला, त्यामुळे कॉन्सर्ट हॉलला आग लागली.

हॉलमध्ये होते 6200 नागरिक

मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण हल्ला झाला क्रोकस सिटी हॉलमध्ये प्रसिद्ध म्यूजिक बँड ‘पिकनिक’चा परफॉर्मन्स सुरू होता. या कॉन्सर्टसाठी सुमारे 6200 नागरिक उपस्थित होते. आम्ही या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करत असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सतत अपडेट केले जात आहे, असल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचे वर्णन दहशतवादी हल्ला असे केले आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने या घृणास्पद गुन्ह्याचा निषेध करण्याचे आवाहन केले. हा दहशतवादी हल्ला अशा वेळी घडला आहे जेव्हा व्लादिमीर पुतिन यांनी नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा विजय नोंदवला असून ते सलग पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून विराजमान होणार आहेत. दुसरीकडे गेल्या दोन वर्षांपासून रशिया युक्रेनशी युद्ध करत आहे.

या दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्बी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘याबाबत अधिक काही सांगता येणार नाही…आम्ही अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. हे चित्र अतिशय भयावह आहे. गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांचा दु:खात आम्ही सहभागी आहोत, असे ते म्हणाले. त्याचवेळी मॉस्कोमधील अमेरिकी दूतावासाने अमेरिकन लोकांना कोणतीही मोठी फंक्शन्स, कॉन्सर्ट्स किंवा शॉपिंग मॉल्मध्ये जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

युक्रेनने दिले स्पष्टीकरण

मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्यावर युक्रेननेही स्पष्टीकरण दिलं आहे. ‘आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की या हल्ल्यांशी युक्रेनचा काहीही संबंध नाही, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे वरिष्ठ सल्लागार मिखाईल पोडोलियाक यांनी स्पष्ट केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर युक्रेनला बदनाम करण्याचा हा डाव आहे. अमेरिकेकडूनही युक्रेनला क्लिनचिट देण्यात आली आहे. यावर रशियाकडून मात्र आक्षेप घेण्यात आला.

पंतप्रधान मोदींनीही केला हल्ल्याचा निषेध

मॉस्को शहरात इसिसकडून घडवण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. आम्ही या कठीण प्रसंगात रशियन सरकारच्या सोबत आहोत, असा दिलासाही त्यांनी दिला. “आम्ही मॉस्कोमधील या हिणकस दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. या दुःखाच्या प्रसंगी भारत सरकार रशियन फेडरेशनच्या लोकांसोबत एकजुटीनं उभं आहे”, असे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.