भारतामुळे हे शहर इस्रायलला मिळालं, इस्रायलला देतेय आर्थिक ताकद
इस्रायल आणि इराण आणि लेबनॉन यांच्या आज रक्तरंजित संघर्ष सुरु आहे. भारतीय सैनिकांच्या शौर्यामुळे इस्रायलला आर्थिक ताकद देणारे शहर मिळालेले आहे. कोणते हे शहर आणि त्याला भारतीय सैनिकांना कसे काय दिले स्वातंत्र्य ते वाचा ...
इराणने इस्रायलने हल्ला केल्याने इस्रायल तीन ठिकाणाहून युद्ध लढत आहे. परंतू इस्रायलच्या आर्थिक ताकद अवलंबून असलेले एक शहर भारताच्या मदतीने इस्रायलला मिळालेले आहे. आज इस्रायलची इकॉनॉमी या शहरामुळे ताकदवान झालेली आहे .या एका शहराने इस्रायलचा व्यापार वाढला आहे. येत्या काळात हे शहर मोठ्या इकॉनॉमिक कॉरीडॉरचा एक भाग बनणार आहे. इस्रायलचे हायफा शहर आज एक बंदर म्हणून विकसित झाले आहे. येत्या काळात भारत-पश्चिमी आशिया (मध्य पूर्व ) युरोप आर्थिक कॉरीडॉरचा ( IMEC ) एक भाग बनणार आहे. या इकॉनॉमी कॉरीडॉरची योजना भारतातील जी-20 परिषदेत झाली होती. भारताचे उद्योगपती गौतम अदानी यांनी हायफाच्या मुख्य बंदरात 10,000 कोटीची गुंतवणूक केली आहे.
भारताच्या मदतीने मिळाले हायफा
हायफा हे इस्रायलच्या तेल अविव आणि जेरुसलेमनंतर तिसरे मोठे शहर आहे. युरोप आणि आशियात होणाऱ्या व्यापाराचा मोठा भाग या बंदरातून होतो. या हायफा शहराला भारतीय सैनिकांनी स्वातंत्र्य देण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. ही घटना पहिल्या महायुद्धाच्या वेळेची आहे. त्यावेळी भारतात ब्रिटीशांचे शासन होते. त्यामुळे तेव्हा भारतीय सैनिक ब्रिटीश सैनिकांसोबत लढत होते.
पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान हायफाला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी 23 सप्टेंबर 1918 मध्ये घडलेला ‘बॅटल ऑफ हायफा’चा हा परिणाम आहे. हायफा शहरावरील ऑटोमन साम्राज्याचा अंत त्यावेळी झाला. तेव्हा या शहरावर ब्रिटीशांचा झेंडा फडकला असला तरी नंतर हे शहर इस्रायलला मिळाले. इस्रायल आणि भारत दोन्ही देशांनी आपल्या इतिहासात बॅटल ऑफ हायफाच्या लढाईला मानाचे स्थान दिले आहे, भारतीय सैनिकांच्या इतिहासात तिचे नाव नोंदले गेले.
हायफाला स्वतंत्र करण्यासाठी जी सैनिकांची तुकडी पाठविली गेली होती तिचे नाव 15th ( इम्पिरियल सर्व्हीस ) कॅवेलरी ब्रिगेड असे होते. या ब्रिगेडमध्ये तेव्हा संस्थानांचे सैनिक सामील असायचे. हायफाला स्वातंत्र्य देण्यात या ब्रिगेडमध्ये सर्वात जास्त सैनिक जोधपुर, हैदराबाद, पटियाला आणि म्हैसूर येथील संस्थानातील होते. तर काही सैनिक काश्मीर आणि काठीयावाड येथील देखील होते.
हायफाच्या इकॉनॉमीचा लेखा जोखा
हायफावर केवळ इस्रायलचा नव्हे तर भूमध्य सागर क्षेत्रातील सर्वात मोठा पोर्ट आहे. या बंदराची वार्षिक क्षमता तीन कोटी टन मालवाहतूकीची आहे. इस्रायलवरुन कार्गोची जेवढी उलाढाल होते त्यातील तीन टक्के एकट्या हायफामधून होते. इस्रायलला हे बंद जागतिक व्यापारातच मदत करीत नाही तर त्याची शस्रास्रं निर्यात करायलाही मदत करते. याशिवाय हायफा शहर कंप्यूटर एंड इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे. हायफा शहराच्या अर्थव्यवस्थेत या उद्योगाचे योगदान 11टक्क्यांहून अधिक आहे.