Israel Hamas Crisis | पॅलेस्टाईनविषयी केले ट्वीट, मिया खलिफाला मिळाले चेकमेट
Israel Hamas Crisis | इस्त्राईलवर पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेने हल्ला चढवला आहे. अमेरिकेसह युरोपियन देशांनी इस्त्राईलला समर्थन दिले आहे. तर इराणने पॅलेस्टाईनचे कौडकौतुक सुरु केले आहे. मिया खलिफा तिच्या बिनधास्तपणा बद्दल प्रसिद्ध आहे, आता तिने आणखी एक वाद ओढावून घेतला आहे.
नवी दिल्ली | 10 ऑक्टोबर 2023 : इस्त्राईलवर पॅलेस्टाईनची (Israel Hamas Crisis)दहशतवादी संघटना हमासने शुक्रवारी रात्री अचानक हल्ला चढवला. या संघटनेने शांततेसाठी चालविलेल्या प्रयत्नांना फूस लावली. अरब राष्ट्रे इस्त्राईलसोबत समेट घडवत असतानाच हमासने त्याला खोडा घातला. दोन्ही देशातील संघर्षात आतापर्यंत 900 इस्त्राईलींना प्राण गमवावे लागले. तर गाझा पट्ट्यात 700 जणांचा मृत्यू झाला. दोन्ही बाजूचे हजारो लोक गंभीर जखमी झाले आहेत. या युद्धात अनेक जण सोशल मीडियावर त्याचे विचार मांडत आहे. समाज माध्यमांवर विखारी विचारांचा महापूर आला आहे. काहींना इस्त्राईलची बाजू योग्य तर कोणाला पॅलेस्टाईन जवळचा वाटत आहे. मॉडेल, अभिनेत्री असलेली मिया खलिफा (Mia Khalifa) तिच्या बिनधास्तपणाबद्दल ओळखल्या जाते. तिच्या याच स्वभावाने तिला पुन्हा गोत्यात आणले आहे. तिने आणखी एक वाद ओढावून घेतला आहे.
काय केले ट्वीट
पॅलेस्टाईन-इस्त्राईल यांच्यामध्ये संघर्ष सुरु आहे. मिया खलिफाने यामध्ये एक ट्वीट केले आहे. “तुम्ही पॅलेस्टाईनमधील सध्याची परिस्थिती पाहत असाल आणि पॅलेस्टिनी नागरिकांच्या बाजूने नसाल तर तुम्ही भेदभाव करत आहात. योग्य वेळ येताच इतिहास ही गोष्ट दाखवेल.” असे तिचे ट्वीट एकदम व्हायरल झाले. तिला नेटकऱ्यांनी चांगलेच फटकारले. तिला अनेकांनी शिव्यांची लाखोली वाहिली. पण एवढ्यावरच थांबेल तो वाद कसला..
If you can look at the situation in Palestine and not be on the side of Palestinians, then you are on the wrong side of apartheid and history will show that in time
— Mia K. (@miakhalifa) October 7, 2023
मिया झाली ट्रोल
7 ऑक्टोबर रोजी मिया खलिफाने हे ट्वीट केले. त्यानंतर ती एकदम ट्रोल झाली. नेटीझन्सने तिला पट्ट्यावर घेतले. सध्याच्या वस्तूस्थितीसाठी कोण जबाबदार आहे असे प्रश्न तिला विचारण्यात आले. तिचे हे ट्वीट व्हायरल झाले. त्यापेक्षा त्यावरच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले. अनेक जागतिक सेलब्रिटींनी मियाची खरडपट्टी काढली. धार्मिक पूर्वग्रह आणि कट्टरता यामुळे ती पण आंधळी झाल्याचे फटकारे तिला लगावण्यात आले. तिने चुकीचा पक्ष निवडल्याचे खडेबोल तिला सुनावण्यात आले. एका युझरने तर तिचे वाक्य म्हणजे हेट स्पीच असल्याची कमेंट केली.
मियाने थांबवले नाही ट्वीट
मिया, युझर्सच्या प्रतिक्रियेने आणखी चवताळली. तिने काही सेलिब्रिटींची नावे घेऊन त्यांच्याविषयी आगपाखड केली. तिचा मुद्दा लावून धरण्यासाठी तिने काही जणांवर आरोपांची राळ उठवली. पण नेटकऱ्यांनी तिच्यावरच्या तिखट प्रतिक्रिया थांबावल्या नाहीत. मियाचा पण टिवटिवाट सुरुच होता.
I’d say supporting Palestine has lost me business opportunities, but I’m more angry at myself for not checking whether or not I was entering into business with Zionists. My bad. https://t.co/sgx8kzAHnL
— Mia K. (@miakhalifa) October 8, 2023
मिया खलिफाची गेली नोकरी
मिया खलिफाने सातत्याने पॅलेस्टाईनला समर्थन दिल्याने तिला नोकरी गमवावी लागली. रेड लाईट हॉलंडचे सीईओ टॉड शापिरो यांनी तिला नोकरीवरुन कमी केले. रेड लाईट हॉलंड कंपनी अमेरिकेसह युरोपमध्ये मशरुम होम ग्रो किटचे उत्पादन करते आणि त्याची विक्री करते. या कंपनीने यावर्षीच्या सुरुवातीला मिया खलिफाला फर्ममध्ये घेतले होते.
बॉसशी पण भांडली
मिया खलिफाला नोकरी काढण्याची घोषणा तिच्या बॉसने ट्वीट करुनच दिली. टॉड शापिरो यांनी ट्वीट करत तिला बेदल केल्याचे जाहीर केले. हे ट्वीट पाहताच मिया पुन्हा भडकली. तिने मग थेट वंशवादाचा आरोप केला. मी एका ज्यू समर्थकासोबत काम करत होते, हे माझं दुर्भाग्य असल्याचे मत तिने मांडले.