israel hamas war | हमासविरोधात लढाईसाठी इस्रायलचे 3 लाख सैन्य सज्ज, परंतू या गोष्टीच्या टंचाईने अडचण

सध्या संपूर्ण इस्रायल युद्धाच्या तयारीत जुंपला आहे. पुरुष आणि महिलांना इमर्जन्सी अंतर्गत सैन्यात सामील केले जात आहे. परंतू सैनिकांना आणि इस्रायली नागरिकांना अनेक वस्तूंची टंचाई जाणवत आहे.

israel hamas war | हमासविरोधात लढाईसाठी इस्रायलचे 3 लाख सैन्य सज्ज, परंतू या गोष्टीच्या टंचाईने अडचण
israel troopsImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 6:31 PM

तेल अवीव | 21 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमासचा संघर्ष ( israel hamas war ) एका निर्णायक वळणावर पोहचला आहे. लवकरच हमासच्या निकाल लावण्यासाठी गाझापट्टीत इस्रायलची सैन्य शिरणार आहे. परंतू इस्रायलच्या समोर एक अडचण निर्माण झाली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये बुलेटप्रुफ जॅकेट आणि अन्य संरक्षक साहित्याची टंचाई निर्माण झाली आहे. बुलेटप्रुफ कंपन्यांनी सध्याची देशातील बुलेटप्रुफ जॅकेटची मागणी पूर्ण करण्यास आम्ही असमर्थ आहोत असे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले आहे.

सध्या संपूर्ण इस्रायल युद्धाच्या तयारीत जुंपला आहे. पुरुष आणि महिलांना इमर्जन्सी अंतर्गत सैन्यात सामील केले जात आहे. त्यांच्याकडे आवश्यक साधने उपलब्ध नसल्याचे योव डोटन यांनी म्हटले आहे. हळूहळू आवश्यक साहित्याचा पुरवठा केला जात आहे. केवळ सैनिकांच बुलेटप्रुफ जॅकेट आणि हेल्मेटची गरज नसून नागरिकांनाही त्याची गरज आहे. मागणी प्रचंड आहे आणि पुरवठा खूपच कमी आहे. इस्रायलने ही लढाई त्यांच्या अस्तित्वाची लढाई केली असून हे युद्ध खूप दिवस चालणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या देश मोठ्या लढाईची तयारी करीत आहे. हे युद्ध ज्यू लोकांच्या अस्तित्वाची लढाई असून आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी साल 1948 नंतर हा इस्रायलसाठी सर्वात महत्वाचा काळ आहे. इस्रायलमध्ये केव्हा कुठेही हल्ला होऊ शकतो. त्यामुळे येथील प्रत्येक नागरिक आपल्या कुटुंबांसाठी बुलेटप्रुफ जॅकेट खरेदी करीत असतो. कारण भौगोलिकदृष्ट्या हा देश चारी बाजूंनी शत्रूंनी घेरलेला आहे.

डोटन यांनी सांगितले की देशाला विविध ठीकाणावरुन मदत मिळत आहेत. इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी भारताचे देखील आभार मानले आहेत. आम्हाला दानात अनेक वस्तू मिळत आहेत. जगभरातून अनेक वस्तू मिळत आहेत. सैनिकांसाठी जेवण, मोजे, कपडे पाठवित आहेत. प्रत्येक जण आपल्या परीने मदत करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही मदतीची जाण ठेवणार

जगभरातून आमचे मित्र आम्हाला वस्तू पाठवित आहेत. खासकरुन भारतातून आम्हाला मदत मिळत आहेत. आम्ही भारताचे केवळ युद्धकाळातील नव्हे तर खूप आधीपासून असलेल्या मैत्री बद्दल आभार मानीत आहे. आम्हाला गरज असताना कोण आमच्या मदतीला धावून आले हे आम्ही लक्षात ठेवणार आहोत असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, इस्रायल सैन्याने युद्ध लढण्यासाठी तीन लाख रिझव्ह सैन्य जमा केले आहे. त्यातली प्रत्येक सैनिकाला सुरक्षा कवच प्रदान केले असल्याचे आयडीएफचे प्रवक्ता मार्कस शेफ यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.