israel hamas war | इस्रायलच्या व्हाईट फॉस्फरस बॉम्बला हमास केमिकल बॉम्बने उत्तर देणार ?
फॉस्फरस बॉम्बचा वापर दुसऱ्या महायुद्धात खुप झाला होता. अमेरिकेने तेव्हा जर्मनीविरोधात याचा खूप वापर केला होता. इराक युद्धात अमेरिकेने देखील या बॉम्बचा वापर केला. व्हिएतनाम युद्धातही याचा वापर झाला आहे.
नवी दिल्ली | 26 ऑक्टोबर 2023 : हमासने 7 ऑक्टोबरच्या सायंकाळी 7.10 वाजता दक्षिण इस्रायलच्या नोवा म्युझिक फेस्टीव्हलमध्ये नाचणाऱ्या तरुण-तरूणींवर अचानक हल्ला केल्याने जग अचंबित झाले. हमासने अवघ्या काही मिनिटांत शेकडो रॉकेटचा वर्षाव केला. इस्रायलची प्रसिद्ध मोसाद गुप्तचर यंत्रणाही या हल्ल्याचा अंदाज घेऊ शकली नाही. आता इस्रायलने हमासच्या संपूर्ण खात्म्यासाठी युद्ध सुरु केले आहे. यात आता निष्पाप सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी जात आहे. पॅलेस्टिनी नागरिकांनी त्यांच्यावर व्हाईट फॉस्फरस बॉम्बचा वापर केल्याचा आरोप इस्रायलवर केला आहे.
काय आहे व्हाईट फॉस्फरस बॉम्ब ?
व्हाईट फॉस्फरस बॉम्ब अर्थात फॉस्फरस या रसायनापासून तयार केला जातो. जोपर्यंत फॉस्फरस संपूर्ण जळून नष्ट होत नही तोपर्यंत तो विध्वंस करीत रहतो. तसेच ऑक्सिजनच्या संपर्क येताच तो अधिक विक्राळ रुप घेत आजूबाजूच्या परिसरातील ऑक्सिजन संपवून टाकतो. त्यामुळे त्या परिसरातऑक्सिजनचा तुटवडा होतो आणि अधिक लोक श्वसन घेता न आल्याने गुदमरुन मरण पावतात.
का धोकादायक आहे ?
व्हाईट फॉस्फरस बॉम्ब हा फॉस्फरस आणि रबरापासून तयार केला जातो. फॉस्फरस हे मेणासारखं केमिकल आहेत. जे हलक्या पिवळे किंवा रंगहिन असते. त्याचा वास लसणा सारखा येतो, हे केमिकल ऑक्सिजनच्या संपर्कात येताच आग पकडते. त्यानंतर ही आग पाण्याने देखील विझत नाही. त्यामुळे ती धोकादायक असते. या फॉस्फरस बॉम्ब 1300 डीग्री सेल्सियसपर्यंत प्रचंड उष्णता तयार करीत असतो. त्यामुळे हाडे देखील जळून भस्म होतात.
माणूस वाचत नाही
फॉस्फरस बॉम्बमधून माणूस कसा तरी वाचला नंतर त्याच्या शरीराचे अनेक अवयव निकामी होतात. त्याला वेगवेगळे इन्फेक्शन होत रहाते. त्वचेतून त्याचे संक्रमण रक्तापर्यंत होते. त्यामुळे हृदय, लिव्हर आणि किडनीला नुकसान पोहचते आणि मल्टी ऑर्गन फेल्युअरने त्याचा मृत्यू होतो.
फॉस्फरस बॉम्बचा वापर दुसऱ्या महायुद्धात खुप झाला होता. अमेरिकेने तेव्हा जर्मनीविरोधात याचा खूप वापर केला होता. इराक युद्धात अमेरिकेने देखील या बॉम्बचा वापर केला. व्हिएतनाम युद्धातही याचा वापर झाला आहे. अरब आणि इस्रायल युद्धातही तो वापरला गेला. 1977 मध्ये जिनेव्हा परिषदेनंतर फॉस्फरस बॉम्बच्या वापरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर बंदी घातली. या बॉम्बचा वापर रहिवासी विभागात झाला तर त्यास रासायनिक अस्रात गणले जाईल.1997 मध्ये झालेल्या या करारावर रशियानेही सह्या केल्या आहेत.
हमास जवळ रासायनिक अस्रे
इस्रायलच्या राष्ट्राध्यक्ष इसहाक हेर्जोग यांच्या दाव्यानूसार रासायनिक अस्र तयार करण्याचे साहित्य हमास जवळ आहे. आता हमास आणि इस्रायलची लढाई रासायनिक अस्राच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. म्युझिक फेस्टीव्हलवर हल्ला करणारे हमासचे काही अतिरेकी मारले गेले होते. त्यांचे मृतदेह काळजीपूर्वक तपासले असता त्यांच्याकडे रासायनिक बॉम्ब बनविण्याचे साहित्य सापडले होते. ज्यात सायनाईड देखील होते.