israel hamas war | हमास इस्रायलवर डागतोय रॉकेट, पण पडत आहेत गाझापट्टीत, काय नेमकं घडतंय
गाझापट्टी येथील हॉस्पिटलवर झालेल्या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायल आणि हमास एकमेकांवर आरोप करीत आहेत. आता इस्रायलच्या अमेरिकेतील दुतावासाने गाझाच्या मिसफायर झालेल्या रॉकेट मॅपच जाहीर केला आहे.
तेल अवीव | 19 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान सुरु असलेल्या यु्द्धाला गुरुवारी 13 दिवस पूर्ण झाले. या युद्धाने दोन्ही बाजूंनी मोठी जिवीतहानी झाली आहे. गाझा पट्टीत तर मृत्यूनी हाहाकार माजला आहे. हमास स्वत:च्या लोकांना मारत असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. 7 ऑक्टोबरच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर गाझातील पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी इस्रायलवर 7 हजाराहून अधिक रॉकेट सोडले आहेत. त्यातील 400 मिस फायर होऊन गाझावरच पडल्याचा दावा इस्रायलच्या अमेरिकन दुतावासाने केला आहे.
हमासला आमच्यावर हल्ला करायचा आहे. परंतू हमासची रॉकेट्स मिसफायर होऊन त्यांच्याच हद्दीत गाझापट्टीत पडत असल्याचे इस्रायलच्या अमेरिकेतील दुतावासाने मॅप सादर करीत म्हटले आहे. त्यांनी पॅलेस्टिनी नागरिकांचा जीव धोक्यात टाकाला असून हा एकप्रकाराचा दुहेरी युद्ध अपराध असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. गाझाच्या एका रुग्णालयावर काही दिवसांपूर्वी रॉकेट हल्ला झाला, त्यात 500 लोक ठार झाले होते. हमासने इस्रायल सैन्यावर रुग्णालयावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे इस्रायली सैन्याने या हल्ल्या मागे पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचा हात असल्याचा दावा केला आहे. यावर आता दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे केले जात आहेत. हल्ल्यानंतर सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केले जात आहेत.
इस्रायल दुतावासाचे ट्वीट येथे पाहा –
Since the Hamas massacre, Palestinian terror groups in Gaza have launched 7000+ rockets at Israel.
Over 400 misfired and landed in Gaza. This map shows some of them.
With every rocket fired, Hamas intends to kill Israelis and puts Palestinian civilians in harm’s way. THIS IS A… pic.twitter.com/rjp6TQRSSc
— Embassy of Israel to the USA | #IsraelUSA75 (@IsraelinUSA) October 19, 2023
7 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमासने इस्रायलवर अचानक हल्ला करुन खळबळ उडविली आहे. यानंतर दोन्ही देशात युद्ध सुरु झाले आहे. हमासने या हल्ल्याची जबाबदारी घेत त्यास इस्रायलविरोधातील सैनिकी कारवाई म्हटले आहे. हमासने गाझापट्टीतून 20 मिनिटांत 5,000 रॉकेट डागले आहेत. इस्रायलचे 1400 नागरिक ठार झाले आहेत. त्यानंतर गाझापट्टीतील 3500 नागरिक ठार झाले आहेत. गाझातील 22 हजार इमारती नष्ट झाल्या आहेत. 10 रुग्णालये आणि 48 शाळांवर इस्रायलने बॉम्ब टाकले आहेत.