‘तुम्हाला मोठा धोका’, अगोदर दिला इशारा, मग ताबडतोब अनेक ठिकाण्यावर जोरदार हल्ला, इस्त्रायल-हिजबुल्लाहमध्ये युद्ध पेटले; आणीबाणीची घोषणा

Israel Hezbollah tension: इस्त्रायलने दक्षिण लेबनॉनच्या रहिवाशांना अगोदर अरबी भाषेत, तुम्ही धोक्यात असल्याचा इशारा दिला. त्यानंतर ताबडतोब अनेक ठिकाण्यावर जोरदार हल्ला चढवला. तर हिजबुल्लाहने पण लागलीच प्रत्युत्तर दिले. इस्त्रायलवर क्षेपणास्त्राचा पाऊस पाडला.

'तुम्हाला मोठा धोका', अगोदर दिला इशारा, मग ताबडतोब अनेक ठिकाण्यावर जोरदार हल्ला, इस्त्रायल-हिजबुल्लाहमध्ये युद्ध पेटले; आणीबाणीची घोषणा
दोन आघाड्यांवर इस्त्रायलचे युद्ध, क्षेपणास्त्रांचा पाऊस, आणीबाणी जाहीर
Follow us
| Updated on: Aug 25, 2024 | 10:48 AM

हमाससोबत युत्ध सुरु असतानाच आता इस्त्रायल दुसऱ्या आघाडीवर पण व्यस्त झाला. इस्त्रायल सैन्याने क्षिण लेबनॉनच्या रहिवाशांना अगोदर अरबी भाषेत, तुम्ही धोक्यात असल्याचा इशारा दिला. त्यानंतर ताबडतोब अनेक ठिकाण्यावर जोरदार हल्ला चढवला. तर हिजबुल्लाहने पण लागलीच प्रत्युत्तर दिले. इस्त्रायलवर क्षेपणास्त्राचा पाऊस पाडला. त्यानंतर आता इस्त्रायल दोन आघाड्यांच्या युद्धात गुंतल्याने आणीबाणी जाहीर करण्यात आली.

इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांचा पाऊस

हे सुद्धा वाचा

हिजबुल्लाहने इस्त्रायलवर एका पाठोपाठ एक क्षेपणास्त्र डागले. या हल्ल्यात इस्त्रायलवर जवळपास 150 लहान-मोठे क्षेपणास्त्र डागण्यात आले. इस्त्रायल सैन्याने पण लागलीच प्रत्युत्तर दिले. त्यांनी हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केले. त्यापूर्वी दक्षिण लेबनॉनच्या रहिवाशांना अरबी भाषेत तुम्ही धोक्यात असल्याची सूचना देण्यात आली. या भागात सातत्याने सायरनाचा भोंगा घोंगावत आहे. रविवारी भल्या पहाटे इस्त्राईली सैन्याने लेबनॉनच्या सीमा भागात धडक मोहीम राबवली. त्यांनी हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केले.

इस्त्रायलच्या मुख्य लष्करी तळ, संरक्षक कवच डोम आणि इतर सैन्य स्थळावर हल्ला चढवल्याचा दावा हिजबुल्लाहने केला आहे. तर आम्ही केवळ दहशतवाद्यांच्या अड्डयांवर, ठिकाण्यांवर हल्ला चढवला. आम्ही रहिवाशी स्थळांना लक्ष्य केले नाही. पण हिजबुल्लाह सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप इस्त्रायलने केला आहे.

बदला घेण्यासाठी हल्ला

लेबनॉनच्या हिजबुल्लाहने रविवारी सकाळी हल्ल्याची पुष्टी केली. बैरुत येथे त्यांच्या कमांडरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इस्त्रायलवर हल्ला चढवल्याचा दावा त्यांनी केला. बैरूत येथील दक्षिणेतील एका उपनगरात हिजबुल्लाहचा वरिष्ठ अधिकारी फवाद शुक्र हा ठार झाला होता. त्यानंतर हिजुबल्लाहने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र डागले. या ताज्या हल्ल्याने दोघात युद्ध पेटले आहे. इस्त्रायल आता दोन आघाड्यांवर युद्धाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे या भागात शांतता नांदण्याची शक्यता धूसर झाली आहे.

अमेरिकेचे घाडमोडींवर बारीक लक्ष

या नवीन धुमश्चक्रीवर अमेरिका नजर ठेऊन आहे. इस्त्रायल-हिजबुल्लाह यांच्यातील तणावावर अमेरिकेचे लक्ष असल्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्पष्ट केले. इस्त्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकारांचे आपण समर्थन करत असल्याचे बायडेन यांनी सांगितले. त्याचवेळी या भागात शांतता नांदावी हा पण अमेरिकाचा प्रमुख उद्देश असल्याचे ते म्हणाले.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.