Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Hezbollah Tension : युद्ध भडकले, इस्त्रायलचे 100 फायटर जेट लेबनॉनमध्ये घुसले, हिजबुल्लाहच्या अनेक तळांवर निशाणा, क्षेपणास्त्रांचा तुफान मारा

Israel Hezbollah Rocket Attack : हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्त्रायलने आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आज भल्या पहाटे हिजबल्लाहने हल्ला चढवला होता. त्यानंतर आता लेबनॉनच्या सीमावर्ती भागात इस्त्रायलचे फायटर जेट घुसले आहे. हिजबुल्लाहच्या अनेक तळांवर निशाणा करत क्षेपणास्त्रांचा तुफान मारा केला.

Israel Hezbollah Tension : युद्ध भडकले, इस्त्रायलचे 100 फायटर जेट लेबनॉनमध्ये घुसले, हिजबुल्लाहच्या अनेक तळांवर निशाणा, क्षेपणास्त्रांचा तुफान मारा
इस्त्रायल-हिजबुल्लाह युद्ध पेटले
Follow us
| Updated on: Aug 25, 2024 | 4:18 PM

हिजबुल्लाहने हल्ला चढवल्यानंतर इस्त्रायलने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रविवारी इस्त्रायलच्या सैन्यांनी लेबनॉनमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. जवळपास 100 लढाऊ विमानांनी, जेट फायटरने सीमावर्ती भागात जोरदार हल्ला केला. इराण समर्थित हिजबुल्लाह ही संघटना मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होती. हिजबुल्लाहने लेबनॉनच्या धरतीवरुन इस्त्रायलवर 320 पेक्षा अधिक कत्युशा क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. वरिष्ठ कमांडर फहाद शुक्र याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचा दावा हिजबुल्लाहने केला होता.

दोन आघाड्यांवर इस्त्रायल

रविवारी सकाळी इस्त्रायलवर हल्ला केल्याची पुष्टी लेबनॉनच्या हिजबुल्लाहने केली. बैरुत येथे त्यांच्या कमांडरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इस्त्रायलवर हल्ला चढवल्याचा दावा त्यांनी केला. बैरूत येथील दक्षिणेतील एका उपनगरात हिजबुल्लाहचा वरिष्ठ अधिकारी फवाद शुक्र हा ठार झाला होता. त्यानंतर हिजुबल्लाहने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला.

हे सुद्धा वाचा

48 तासांची आणीबाणी

हिजबुल्लाहविरोधात आक्रमक होत इस्त्रायलचे संरक्षण मंत्री योआव गॅलेंट यांनी पुढील 48 तासांसाठी आणीबाणी घोषीत केली आहे. तर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी उत्तरेतील या धुमश्चक्रीबाबत माहिती देण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. जो आमचे नुकसान करेल, आम्ही त्याचे नुकसान करु, त्याला करारा जवाब देऊ असे नेतन्याहू यांनी या बैठकीत स्पष्ट केले. Times Of Israel च्या वृत्तात यासंबंधीचा उल्लेख करण्यात आला आहे.

इस्त्रायलच्या लढाऊ विमानांनी लक्ष्याचा अचूक भेद केल्याचा दावा करण्यात आला आहे. हिजबुल्लाह रॉकेट लाँचर बॅरलवर हल्ला चढवला होता. त्यात ते सर्व नष्ट झाल्याचा दावा इस्त्रायलच्या लष्कराने केला. या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या लेबनॉनमधील 40 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.

इस्त्रायल-हिजबुल्लाहच्या तणावावर बायडेनची नजर

या नवीन धुमश्चक्रीवर अमेरिका नजर ठेऊन आहे. इस्त्रायल-हिजबुल्लाह यांच्यातील तणावावर अमेरिकेचे लक्ष असल्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्पष्ट केले. इस्त्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकारांचे आपण समर्थन करत असल्याचे बायडेन यांनी सांगितले. त्याचवेळी या भागात शांतता नांदावी हा पण अमेरिकाचा प्रमुख उद्देश असल्याचे ते म्हणाले.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.