हिज्बुल्लाहच्या हल्ल्याने इस्रायल हादरले… रॉकेट आणि मिसाईलचा मारा; नागरिक जीवमुठीत घेऊन शेल्टरमध्ये लपले

सध्या इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. रविवारी झालेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहने इस्रायलवर रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला.

हिज्बुल्लाहच्या हल्ल्याने इस्रायल हादरले... रॉकेट आणि मिसाईलचा मारा; नागरिक जीवमुठीत घेऊन शेल्टरमध्ये लपले
Follow us
| Updated on: Sep 22, 2024 | 8:27 PM

Israel-Hezbollah War : लेबनानमध्ये झालेल्या पेजर ब्लास्ट आता हिजबुल्लाहने इस्रायलविरोधात युद्ध पुकारलं आहे. लेबनानमधील संघटना हिजबुल्लाहने आज इस्रायलच्या सीमेवरील तळांवर हवाई हल्ला केला. यामुळे सध्या इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. रविवारी झालेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहने इस्रायलवर रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. जवळपास शेकडो रॉकेटचा मारा केला आहे. एका अहवालानुसार, हिजबुल्लाहने रविवारी पहाटे उत्तर इस्त्रायलमध्ये 100 हून अधिक रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले आणि मोठा गोंधळ उडाला. या हल्ल्यानंतर लाखो नागरिकांना जीव मुठीत घेऊन शेल्टरमध्ये लपले.

इस्त्रायली संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहकडून सतत इस्रायलविरोधात हल्ले केले जात आहेत. रविवारी सकाळी जेझरील खोऱ्यात 140 हून अधिक रॉकेट आणि ड्रोन डागण्यात आले. यानंतर हैफा, नाझरेथ, अफुला, लोअर गॅलीलीसह अनेक लष्करी तळांजवळ अलर्ट जारी करण्यात आला. IDF ने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहचे दहशतवादी सतत आमच्या नागरिकांना लक्ष्य करत आहेत. यामुळे हजारो इस्त्रालयींना जीव मुठीत घेऊन शेल्टरमध्ये रात्र काढावी लागली. त्यांच्या डोक्यावरुन सतत रॉकेटचा वर्षाव होत होता. काही रॉकेट हे त्यांच्या घरावरही पडले. तर काही रॉकेटचा आवाज सतत येत होता.

इस्त्रायलकडून शेकडो क्षेपणास्त्रे डागले

या हल्ल्यानंतर इस्रायलनेही प्रत्युत्तर दिले. इस्त्रायलकडून ही शेकडो क्षेपणास्त्रे डागण्यात आली. लेबनानमध्ये झालेल्या पेजर आणि वॉकीटॉकीच्या स्फोटानंतर इस्रायल काही दिवस गप्प बसेल असा अंदाज लावला जात होता. तसेच लेबनानकडून आपल्या शत्रूंच्या पुढील हालचालींचा अंदाज घेतला जाईल आणि त्यानंतर रणनिती आखली जाईल, असे बोललं जात आहे. मात्र आता सतत होणारे हल्ले पाहता ते देखील यात थांबणार नसल्याचे पाहायला मिळत आहे.

मंगळवार 17 सप्टेंबर रोजी लेबनानमध्ये एकाचवेळी अनेक पेजरचा स्फोट झाला. यामुळे हिजबुल्लाहचे अनेक सैनिक अपंग झाले. काही जायबंदी झाले तर सर्वच जखमी झाले. या हल्ल्यात एकूण 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचे कनेक्शन इस्रायलशी आहे. या हल्ल्यात इस्रायलचाच हात असल्याचा आरोप हिजबुल्लाहने केला आहे. पण हिजबुल्लाहने इस्रायली सैन्यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

पेजरचा वापर का?

जग 21 व्या शतकात आलं आहे. संपूर्ण जगाकडे मोबाईल आहेत. अशावेळी हिजबुल्ला या संघटनेचे सैनिक पेजर्सचा वापर का करत होते? असा सवाल सर्वांनाच पडल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण म्हणजे इस्रायलच्या सैन्याला आपला ठावठिकाणा लागू नये म्हणून हिजबुल्लाहचे सैनिक पेजर्सचा वापर करत होते. पेजर्समुळे लोकेशन ट्रेस होत नाही. मोबाईलमुळे लोकेशन ट्रेस होत होतं. लोकेशन ट्रेस झाल्यास जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळेच गेल्यावर्षी हिजबुल्लाहने ‘ब्रेक युवर फोन’ ही मोहीम राबवली होती.

'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप.
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका.
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?.
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?.
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली.
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल.
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा.
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?.
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा.