Israel – Hezbollah War : युद्धाला नाही विराम; इस्त्रायल आता पेटले ईरेला, आता कुणाचा ठरणार काळ, नेतन्याहू यांचा इशारा काय?

Ceasefire Proposal Rejected : मध्य-पूर्वेतील इस्त्रायल-हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष आता ईरेला पेटला आहे. हे युद्ध संपवण्याची विनंती अमेरीका आणि फ्रान्स यांनी केली होती. पण युद्धविरामाचा प्रस्ताव इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी फेटाळून लावला. त्यामुळे हे युद्ध अजून भडकण्याची चिन्हं आहेत.

Israel - Hezbollah War : युद्धाला नाही विराम; इस्त्रायल आता पेटले ईरेला, आता कुणाचा ठरणार काळ, नेतन्याहू यांचा इशारा काय?
युद्ध भडकणार?
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 6:31 PM

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्ध विरामाचा प्रस्ताव फेटाळल्याने मध्य-पूर्वेतील युद्ध भडकण्याची दाट शक्यता आहे. इस्त्रायल पंतप्रधान कार्यालयाने याविषयीचा वेगळाच खुलासा केला आहे. त्यांच्या मते, अमेरिका आणि फ्रान्स या दोन देशांनी युद्ध विरामाचा प्रस्ताव दिला होता. पण त्यावर पंतप्रधानांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे संभ्रम वाढला आहे.  मग काय म्हणाले नेतन्याहू? काय दिला इशारा?

पूर्ण क्षमतेने आगेकूच करा

इस्त्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, पंतप्रधान नेतन्याहू यांनी इस्त्रायलच्या लष्कराला पूर्ण क्षमतेनीशी पुढे जाण्याचा आदेश दिला आहे. सोबतच IDFच्या त्या योजनेनुसार पुढील कारवाईचे निर्देश दिले आहे, जे अगोदर ठरले होते. त्यामुळे इस्त्रायलचे सैन्य लवकरच लेबनॉनच्या जमिनीवर आक्रमण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

अमेरिका-फ्रान्सचा युद्ध विरामाचा प्रस्ताव

अमेरिका आणि फ्रान्सने इस्त्रायल आणि हिजबुल्लाहचे युद्ध समाप्त करण्यासाठी बुधवारी तात्काळ 21 दिवसांच्या युद्धविरामाची विनंती केली होती. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सौदी अरब, UAE, कतार सह अनेक युरोपियन देशांनी या प्रस्तावाचे समर्थन केले होते. तर इस्त्रायलाने या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण हिजबुल्लाहविरोधात हल्ले तीव्र करण्याचा इशारा दिला होता. तर दुसरीकडे हिजबुल्लाहने पण युद्ध विरामाच्या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

इस्त्रायलच्या हल्ल्यात 600 हून अधिक जणांचा मृत्यू

बुधवारी इस्त्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यात 72 लोकांचा मृत्यू झाला. बॉम्बहल्ल्यात आतापर्यंत 620 हून अधिक लोकांचा मृत्यू ओढावला. तर हिजबुल्लाहने उत्तरी इस्त्रायलमधील हायफा या लष्करी स्थळांना लक्ष्य केल्याचा दावा केला. इस्त्रायल सैन्याने या हल्ल्याला दुजोरा दिलेला नाही. यापूर्वी हिजबुल्लाहने 45 रॉकेटने हल्ल्याचा दावा IDF ने केला होता. इस्त्रायलचे सैन्य लवकरच लेबनॉनच्या जमिनीवर आक्रमण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लेबनॉन, हिजबुल्लाह अलर्ट झाले आहेत. तर इस्त्रायल आता कोणती कारवाई करते याकडे जगाचे लक्ष लागले आहे. पण या नवीन रणनीतीमुळे युद्ध अजून भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.