Israel Palestine Crisis | कोण आहे Hamas? काय आहे इस्त्राईलसोबतचा वाद
Israel Palestine Crisis | पॅलेस्टाईनच्या हमास या संघटनेने शुक्रवारी रात्रीपासून इस्त्राईलवर हल्ला चढवला. अर्थात हा काही एकाएक हल्ला झालेला नाही. पॅलेस्टाईन आणि इस्त्राईल हे हाडवैरी आहेत. त्यांच्या या वादाला नेमकी कारणं तरी काय आहेत आणि ही हमास संघटना आहे तरी का? तिच्याकडे आधुनिक शस्त्र आली तरी कशी?
नवी दिल्ली | 7 ऑक्टोबर 2023 : तर गाझा पट्टीत पुन्हा अशांतता आली आहे. शुक्रवारी रात्री पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेने इस्त्राईलवर हल्ला (Israel Palestine Crisis) चढवला. शनिवारी सकाळी पॅलेस्टाईनच्या हमास गटाने गाझा पट्टीत हल्ला तीव्र केला. हमासने गाझा पट्टीत जवळपास 20 मिनिटात 5000 रॉकेट हल्ले चढवले. लष्कराची वाहनं ताब्यात घेतली आहे. तर इस्त्राईलच्या पाच सैनिकांना त्यांनी ओलीस ठेवले आहे. या हल्ल्यात जवळपास 5 लोक मारले गेले आणि 100 हून अधिक जण गंभीर झाले आहेत. कायमच युद्धाची परिस्थिती असल्याने इस्त्राईलने लागलीच मोर्चा सांभाळला आहे. काय आहे या वादाची किनार, का आहेत हे एकमेकांचे कट्टर वैरी, हमास संघटना (Hamas Group) आहे तरी काय, तिला कोणाचा पाठिंबा आहे?
हमास आहे तरी काय?
तर अनेक देश हमासला पॅलेस्टाईन दहशतवादी संघटना म्हणून ओळखतात. तर ही संघटना स्वतःला पॅलेस्टाईन इस्लामिक चळवळ मानते. या संघटनेचाच राजकीय पक्ष पॅलेस्टाईनमध्ये सक्रिय आहे. गाझा पट्टीत जवळपास दोन दशलक्षाहून अधिक पॅलेस्टाईन नागरिक राहतात. इस्त्राईलविरोधात लढण्यासाठी त्यांचे सशस्त्र दल आहे, त्यालाच हमास म्हणतात. अर्थात हमासचा एक गट पूर्णतः दहशतवादी कारवायात गुंतलेला आहे. इस्त्राईलवर हल्ला चढवणे. अशांतता निर्माण करणे यात त्यांचा सक्रीय सहभाग अनेकदा उघड झाला आहे. केवळ इस्त्राईलच नाही तर अमेरिका, इंग्लंड, युरोपातील अनेक देशांविरोधात ही संघटना काम करते.
कधी झाली या संघटनेची स्थापना
इस्त्राईल-अरब यांच्यात 1967 मध्ये युद्ध झाले. त्यात इस्त्राईलने युद्ध जिंकले. हा भूभाग ज्यू लोकांच्या अधिपत्याखाली आला. त्यानाराजीने हमास ही संघटना 1980 मध्ये स्थापन झाली. वेस्ट बँग आणि गाझा पट्टीतून ज्यू लोकांना हकलण्यासाठी हमास संघटना आकार घेऊ लागली. इस्त्राईल विरोधाला येथून धार आली. या संघटनेने दहशतवादी कारवाया सुरु केल्या. ज्यू लोकांना टार्गेट करायला सुरुवात झाली. दोन्ही भागात लष्करी प्रशिक्षणाला सुरुवात झाली. भूभागावरुन सुरु झालेली लढाईनंतर धर्मावर आडली.
संघटनेची मुळं ब्रदरहूडमध्ये
पॅलेस्टाईन मु्स्लीम ब्रदरहूड ही संघटना 1946 साली जेरुसलममध्ये सुरु झाली होती. या संघटनेचा ज्यू राष्ट्राला विरोध होता. अरब राष्ट्रांचा पण स्वतंत्र ज्यू राष्ट्राला विरोध होता. त्यातून झालेल्या युद्धात इस्त्राईल अस्तित्वात आले. या मुस्लीम ब्रदरहूड संघटनेतून पुढे हमासची बीजं पेरली गेली.
2006 मध्ये सत्तेत
ही संघटना 2006 मध्ये सत्तेत आली. तिने Palestinian Legislative Council (PLC) मध्ये सत्ता मिळवली. या संघटनेला काही दहशतवादी संघटना आणि काही देश मोठा निधी पुरवत असल्याचा आरोप इस्त्राईल करतो. अर्थात इस्त्राईलचा रोख अरब राष्ट्रांकडे असतो हे वेगळं सांगायला नको.