इस्रायलवर मिसाईल हल्ला होताच नेतन्याहू यांचा इराणला कडक शब्दात इशारा; म्हणाले, याची भरपाई…

Benjamin Netanyahu First Reaction on Missile Attack : इराण आणि इस्रायल युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. इराणने काल रात्री इस्रायलवर हल्ला केला. त्यानंतर आता इस्रायलदेखील ॲक्शन मोडमध्ये आला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिला आहे. वाचा...

इस्रायलवर मिसाईल हल्ला होताच नेतन्याहू यांचा इराणला कडक शब्दात इशारा; म्हणाले, याची भरपाई...
नेत्यन्याहू यांचा इराणला इशाराImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 8:44 AM

इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये सध्या युद्धाची स्थिती आहे. इराणने काल इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यानंतर आता इस्रायलकडूनही जशाच तसं उत्तर देण्याची तयारी सुरु झाली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला इशारा दिला आहे. इराणने आज आमच्यावर हल्ला करून फार मोठी चूक केली आहे. त्यांना याची भरपाई करावी लागेल, असं बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. इराणने आमच्यावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे. आता आम्ही या हल्ल्याला उत्तर देणार आहोत. आमचा प्लॅनही तयार आहे. आता जागा आणि वेळ आम्ही ठरवू… अशा शब्दात इस्रायलने इराणला इशारा दिला आहे.

क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत इस्रायलने काय म्हटलं?

इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. इस्रायलच्या लष्कराने याबाबतचं निवेदन प्रसिद्ध केलं आहे. इराणने आतापर्यंत 180 क्षेपणास्त्रांनी आमच्यावर हल्ला केला आहे. यातील अनेकवेळा आम्ही त्यांना जशास तसं उत्तर दिलं आहे. यावेळी इराणने आज आमच्यावर हल्ला करून फार मोठी चूक केली आहे. त्यांना याची भरपाई करावी लागेल, असं म्हणत इस्रायलने इराणला प्रत्युत्तर दिलंय.

इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला

इराणने 180 क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर जगभरात खळबळ माजली. इस्रायलची राजधानी तेल अवीवजवळच्या जाफामध्ये गोळीबार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यात 8 लोकांनी प्राण गमावल्याचा दावा केला जात आहे.

17 सप्टेंबर इस्रायलने लेबनॉनमध्ये पेजर्स आणि वॉकी- टॉकींमध्ये स्फोट घडवले होते. या स्फोटामध्ये 39 जणांचा मृत्यू झाला आहे. यात हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेच्या लोकांचा समावेश होता. तसंच सामान्या नागरिकांनाचाही या हल्ल्यात मृत्यू झाला होता. हिजबुल्लाह संघटनेचे नेते हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूनंतर पण इस्रायल लेबनॉनवर सातत्याने हल्ला करत राहिला. अमेरिकेकडून शांततेचं आवाहन करण्यात आल्यानंतरही इस्लायलने हल्ले सुरुच ठेवले. आता इराणने क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर इस्लायल देश पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आला आहे. भरपाई करावी लागेल, अशा शब्दात इराणला इशारा दिला आहे.

सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.