israel hamas war | हमास 4 वर्षांपासून करत होता हल्ल्याची तयारी, या व्यक्तीच्या हत्येचा घेतला बदला, पाहा नेमके काय प्रकरण
इस्रायल आणि हमासमध्ये गेले दोन आठवडे युद्ध सुरु आहे. या इस्रायलवरील इमासच्या हल्ल्यात कथित रुपाने इराणचा हात असल्याचे म्हटले जात आहे. इराणने हमासला हिजबुल्लाहच्या मदतीने चार महिन्यांचे प्रशिक्षण दिले होते असे उघड झाले आहे.
तेल अवीव | 21 ऑक्टोबर 2023 : इस्रायलने गाझावर चढाई करण्याची पूर्ण तयारी केली आहे. इस्रायलचे शेकडो टॅंक आणि तीन लाख सैनिक गाझात घुसण्यासाठी केवळ शेवटच्या आदेशाची वाट पाहात आहेत. हवाई हल्ल्यात शेकडो लोक ठार झाले आहेत. 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर नृशंस हल्ला केल्यानंतर हे ( israel hamas war ) युद्ध सुरु झाले आहे. हमासचा हा हल्ला इतका सुनियोजित आणि वेगवान होता की इस्रायल त्यामुळे भांबावला. हमास या हल्ल्याची तयारी गेली चार वर्षे करीत होता. हमासचे अतिरेकी दक्षिण लेबानॉनमध्ये यासाठी खडतर प्रशिक्षण घेत होते अशी माहिती उघड झाली आहे.
इराणचे सर्वोच्च लष्कर अधिकारी जनरल कासिम सुलेमानी यांची अमेरिकेने साल 2020 मध्ये मिसाईलद्वारे घात लावून हत्या केल्याने इराणला मोठा हादरा बसला. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयतुल्लाह अली खोमेनी यानंतर जनरल कासिम सुलेमानी यांचे स्थान होते. इराणची राजधानी बगदादमध्ये एअरपोर्टजवळ अमेरिकेने मिसाईल हल्ल्यात कासिम सुलेमानी यांना ठार केले. या हल्ल्यासाठी इस्रायलने अमेरिकेची मदत केली होती. इस्रायलच्या मदतीनेच अमेरिकेचे हे ऑपरेशन पार पडले होते. याचा बदला इराणला घ्यायचा होता. पॅलेस्टाईन निवडणूकात हमासचा विजय झाल्यानंतर लगेच ही योजना आखण्यात आली. यासाठी हमासच्या 200 अतिरेक्यांना हल्ल्यासाठी खडतर प्रशिक्षण देण्यात आले.
इराण काय मिळाले ?
हमासने अतिरेक्यांना दक्षिण लेबनॉनला पाठविले. तेथे हिजबुल्लाहच्या कमांडरनी हमासच्या अतिरेक्यांना विशेष प्रशिक्षण दिले. यामागे कथित स्वरूपात इराणचा हात असल्याचे म्हटले जाते. इस्रायलवर मोठा हल्ला करून अमेरिका आणि इस्रायलचं मनोबल कमकुवत करण्याची योजना यामागे होती. साल 2021 तालिबानद्वारा अफगाणिस्तानात अमेरिकन सैन्याचा पराभव मध्य पूर्वेत इस्रायल आणि अमेरिकाच्या विरोधात इराणच्या या कटाला पोषक ठरली. या प्रकारे इराणने हमास आणि हिजबुल्लाह यांना इस्रायलवरील 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यास पाठींबा देऊन दोन उद्दीष्ठ पूर्ण केली. पहिले इस्रायल विरोधात अरब देशांना एकत्र करणे, दुसरे पॅलेस्टाईनच्या प्रश्नावर इस्रायली सैन्य आणि समाजात फूट पाडणे.
सुलेमानी इराणसाठी का महत्वाचे ?
इराणची स्पेशल आर्मी कुद्स सेनाचे प्रमुख म्हणून कासिम सुलेमानी यांना संपूर्ण जगात ओळख मिळाली होती. साल 1998 मध्ये त्यांना इराणी लष्कराचे प्रमुख केले. त्यांनी लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह, सिरीयात असद आणि इराकमध्ये शिया संबंधित मिलिशिया गटाशी इराणची मैत्री वाढविण्यास मदत केली.