इस्रायलचे वाईट दिवस सुरु ? नेतान्याहू यांच्या दोन लाडक्या मुस्लीम देशांनी दिला झटका
इस्रायल आणि हमासमध्ये गेल्यावर्षी 7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरुच आहे. आता इस्रायल लेबनॉनवर बॉम्बची बरसात करीत आहे.या दरम्यान आता अरब देशा इस्रायलच्या विरोधात एकत्र येत आहे. आता बेंजामिन नेतान्याहू यांना आवडत्या मुस्लीम देशांनी त्यांचा मोठा झटका दिला आहे.
इराणला प्रत्युत्तर न देता इस्रायलने आता लेबनॉन आणि गाझापट्टीत बॉम्ब फेक सुरुच ठेवली आहे. आता अरब देश इस्रायलच्या IDF विरोधात एकजूट होत आहेत. आतापर्यंत काहीही न बोलणारे अरब देश देखील आता इस्रायलशी आता आर-पार भूमिका घेण्याच्या मूडमध्ये आहेत. या यादीत आता इजिप्त आणि जॉर्डन या देशांचे नाव सर्वात वरती आहे. या देशांनी इस्रायलवर इराणच्या हल्ल्यांना निष्क्रीय करण्यासाठी इस्रायलची मदत केली होती. आता असे वाटतंय की इस्रायलचे वाईट दिवस सुरु होणार आहेत.
इजिप्त आणि जॉर्डन यांची काय भूमिका ?
इजिप्त आणि जॉर्डन या मुस्लीम देशांनी गाझा आणि लेबनॉनवरील इस्रायलच्या हल्लांना तातडीन थांबविण्याचे आणि या संघर्षाचा राजकीय वाटाघाटीतून निकाल लावावा अशी विनंती केली आहे. तर कतारने हेजबोला आणि इस्रायल यांच्या संघर्षादरम्यान लेबनॉनला आपला पाठींबा व्यक्त केला आहे. तसेच इस्रायली हल्ल्यांचा निषेध केला आहे. इजिप्तचे परराष्ट्र व्यवहारमंत्री बद्र अब्देलती आणि जॉर्डनचे उप पंतप्रधान तसेच प्रवासी मंत्री अयमान सफादी यांनी 8 ऑक्टोबर रोजी काहिरा येथे एक संयुक्त पत्रकार परिषद घेत हे आपले म्हणणे मांडले आहे.
दोन्ही मंत्र्यांनी क्षेत्रातील वाढत्या राजकीय आणि सुरक्षा संकटावर उत्तर शोधण्यासाठी चर्चा केली आहे. इजिप्त आणि जॉर्डन यांच्या अन्य देशांसी असलेल्या संपर्कावर देखील यावेळी चर्चा झाली. या क्षेत्राला व्यापक युद्धात अडकण्यापासून रोखण्यासाठी यावेळी चर्चा देखील झाली आहे. अब्देलती यांनी सांगितले की या चर्चेत गाझात युद्धविराम व्हावा, गाझापट्टी आणि वेस्ट बॅंक क्षेत्रातील क्रुर इस्रायली हल्ले रोखण्यासाठी अरब देशांचे प्रयत्नात वाढ करण्यावर या चर्तेत जोर देण्यात आला.
जॉर्डनच्या परराष्ट्र मंत्र्याचा इस्रायलला इशारा
जॉर्डन गाझापट्टी आणि लेबनॉनवरील इस्रायलचे आक्रमक धोरण समाप्त करण्यासाठी इजिप्त सोबत काम करण्याचे धोरण सुरुच ठेवेल असे जॉर्डनचे परराष्ट्र मंत्री यांनी म्हटले आहे. सदाफी यांनी वेस्ट बॅंकमधील वाढत्या तणावाबद्दल सावध करताना येथील स्थिती अशीच स्फोटक राहील तर ती आणखी खतरनाक स्वरुप धारण करेल. याबाबत कोणताही उशीर होऊ नये इस्रायलने स्वत:ला कायद्याहून मोठे मानू नये असेही ते यावेळी म्हणाले. कतारचे आंतरराष्ट्रीय सहयोग राज्यमंत्री लोलवा अल-खतर यांनी लेबनॉनचे समर्थन केले असून इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अरब राष्ट्रांनी एकत्र यावे असेही म्हटले आहे.