नवाज शरीफ यांच्या प्रचार रॅलीत आले वाघ-सिंह, मग काय झालं ? असं केवळ पाकिस्तानातच घडू शकते !

पाकिस्तानात येत्या फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणूका असून प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्षांच्या प्रचार सभांचा धुरळा पाकिस्तानात उ़डाला आहे. महागाईने होरपळत असलेल्या पाकिस्तानाची अवस्था बदलण्याचे आश्वासन नवाझ शरीफ यांनी दिले आहे. परंतू त्यांच्या रॅलीत खरे वाघ आणि सिंह आणल्याने एकच गोंधळ उडाला आहे.

नवाज शरीफ यांच्या प्रचार रॅलीत आले वाघ-सिंह, मग काय झालं ? असं केवळ पाकिस्तानातच घडू शकते !
nawaz sharif supporters bring a tiger to rally Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 5:12 PM

इस्लामाबाद | 25 जानेवारी 2024 : आर्थिक बजबजपूरी महागाईने त्रस्त झालेल्या पाकिस्तानात आगळंच घडले आहे. पाकिस्तानात लवकरच सार्वजनिक निवडणूका होत आहेत. पाकिस्तानाचे राजकीय पक्ष निवडणूकीच्या प्रचाला लागले आहेत. या पक्षामध्ये माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पार्टीने तर सर्वांवर कडी केली आहे. नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग ( एन ) PMLN ने पक्षाच्या समर्थकांनी असली वाघ आणि सिंहाना घेऊन आले. त्यामुळे पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या वाघ आणि सिंहासोबत सेल्फी काढत आनंद साजरा केला आहे. पाकिस्तानच्या अनोख्या प्रचार रॅलीची जगभर चर्चा होत आहे.

पाकिस्तानातील लाहोर शहरातील नॅशनल असेंबली 130 वर नवाझ शरीफ यांच्या पक्षाची विशाल रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत नवाझ शरीफ यांच्या पक्षाचे समर्थक खरे वाघ आणि सिंह घेऊन रॅलीत आल्याने एकच गोंधळ उडाला. हे वाघ आणि सिंह पिंजऱ्यात बंदिस्त असले तरी त्यांना पाहायला आणि त्यांच्या सोबत सेल्फी काढायला कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली. एका खुल्या गाडीत हे वाघ आणि सिंहाचे पिंजरे ठेवले होते.

येथे पाहा ट्वीट –

पार्टीचे चिन्ह असल्याने

नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएलएनचे चिन्ह वाघ आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवाझ शरीफ यांच्या समर्थकांनी थेट वाघाला प्रचार सभेत उतरविल्याचे सांगितले जाते. काही लोकांनी या निर्णयाबद्दल पक्षावर टीका देखील केली आहे.

नवाझ शरीफ यांच्या नाराजीनंतर….

कार्यकर्त्यांच्या या अतिउत्साही प्रकारावर पार्टीचे प्रमुख नवाझ शरीफ यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर हे वाघ आणि सिंह पुन्हा परत नेण्यात आल्याचे PMLN चे नेते मरियम औरंगजेब यांनी सांगितले. मिडीयातील बातम्यानूसार पीएमएनएलच्या निवडणूक रॅलीत याआधी देखील असली वाघ आणि सिंह आणण्याचा प्रकार झाला होता. या रॅलीत पीएमएलएन नेता आणि नवाझ शरीफ यांची कन्या मरयम नवाझ देखील हजर राहीलेल्या आहेत.

पाकिस्तानात 8 फेब्रुवारीला निवडणूक

पाकिस्तानात 8 फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणूका होत आहेत. निवडणूकीच्या प्रचारात नवाझ शरीफ यांनी आपण सत्तेतून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आणि पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला. आपण जर सत्तेत परत आलो तर पुन्हा देशात सकारात्मक बदल पाहायला मिळतील असे आश्वासन नवाझ शरीफ यांनी दिले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.