Japan Earthquake : जापानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के; त्सुनामीची शक्यता, 20 लाख घरांची बत्ती गुल! पाहा व्हिडीओ
मिळालेल्या माहितीनुसार भूंकपाचा केंद्रबिंदू फुकुशिमा क्षेत्रात 60 किलोमीटर जमिनीच्या आत होता. जापानमधील स्थानिक वेळेनुसार रात्री 11 वाजून 36 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर पूर्वोत्तर भागात त्सुनामीची शक्यता वर्तवण्यात आली असून, 1 मीटरपर्यंतच्या लाटा उसळण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय.
मुंबई : जापानमध्ये भूकंपाचे (Japan Earthquake) तीव्र धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केलवर 7.3 इतकी नोंदवण्यात आलीय. भूकंपानंतर जापानच्या पूर्वोत्तर भागात त्सुनामीची (Tsunami) भीती व्यक्त करण्यात आलीय. तर भूकंपानंतर जापानमध्ये जवळपास 20 लाख घरांची वीज गेल्याची माहिती एएफपीने टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीच्या हवाल्यानं दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार भूंकपाचा केंद्रबिंदू फुकुशिमा (Fukushima) क्षेत्रात 60 किलोमीटर जमिनीच्या आत होता. जापानमधील स्थानिक वेळेनुसार रात्री 11 वाजून 36 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर पूर्वोत्तर भागात त्सुनामीची शक्यता वर्तवण्यात आली असून, 1 मीटरपर्यंतच्या लाटा उसळण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय. भूकंपामुळे जीवितहानी किंवा वित्तहानीची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
Earthquake jolts Japan’s northeast coast, cuts power to parts of Tokyo https://t.co/vPZzcy6z0s pic.twitter.com/1BtUFqcKkv
— Reuters (@Reuters) March 16, 2022
SHOCKING: Huge flashes seen in the sky as 2 million homes in #Japan left without power after 7.3 earthquake pic.twitter.com/CfjXcb5Lmv
— GBN (@GBNfeed) March 16, 2022
WATCH: Woman captures the moment 2 strong earthquakes hit off central #Japan pic.twitter.com/qr2mPBvDrp
— GBN (@GBNfeed) March 16, 2022
यापूर्वी 22 जानेवारीला पश्चिम जापानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. यात 10 जण जखमी झाल्याची नोंद होती. भूकंप शनिवारी दुपारी 1 वाजून 8 मिनिटांनी आला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू क्यूशू द्वीपजवळ जमिनीत 40 किलोमीटर अंतरावर होता. त्यावेळी त्सुनामीची शक्यता वर्तवण्यात आली नव्हती.
भूकंप झाल्यास काय काळजी घ्याल?
भूकंपाच्या धक्के जाणवल्यास तातडीने घराबाहेर पडून, मोकळ्या मैदानात या. जर अचानक भूकंप झाला आणि घराच्या बाहेर पडता येणे शक्य नसल्यास घरी असलेल्या कॉट किंवा टेबलखाली स्वता:ला कव्हर करा. या काळात घरातील सर्व विजेची साधने आणि गॅसचे कनेक्शन बंद ठेवा. आपतकालीन स्थिरीमध्ये घटनेची माहिती तातडीने संबंधित यंत्रणेला द्या, त्यामुळे बचाव कार्य वेगाने करता येऊ शकते.
इतर बातम्या :