जगाची शान असलेलं हे विमानतळ बुडतंय, अब्जो डॉलर होणार बरबाद, का आले संकट?

| Updated on: Jan 05, 2024 | 7:16 PM

ग्लोबल वार्मिंग आणि इतर पर्यावरणीय कारणांमुळे समुद्र किनाऱ्यावरील मुंबई सारखी शहरे बुडण्याचा धोका पर्यावरण तज्ज्ञांनी वर्तविला आहे. अशात जगातील एक शान असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या काही वर्षात समुद्रात गडप होणार आहे.

जगाची शान असलेलं हे विमानतळ बुडतंय, अब्जो डॉलर होणार बरबाद, का आले संकट?
kansai international airport
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

जपान | 5 जानेवारी 2023 : अति पूर्वेकडील देश असलेला जपानचा एक एअरपोर्ट हळूहळू समुद्रात बुडत चालला आहे. जपानने 20 अब्ज डॉलर रक्कम खर्च करून ज्या एअरपोर्टला तयार केले तो असा बुडत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जपानच्या ग्रेटर ओसाका परिसरात असलेले हे कानसाई ( kansai airport ) आंतरराष्ट्रीय विमानतळ एका कृत्रिम बेटावर उभं आहे. परंतू इमारतीच्या वजनांमुळे हे विमानतळ हळूहळू बुडत चालले आहे. या कानसाई इंटरनॅशनल एअरपोर्टचे उद्घाटन 4 सप्टेंबर 1994 रोजी झाले होते. हा विमानतळ ओसाका बेटाला सर्व जगाशी जोडतो. एवढेच नाही तर ओसाका इंटरनॅशनल विमानतळाचा भारही या विमानतळामुळे कमी झाला आहे. या बेटाला 20 अब्ज डॉलर खर्च करुन बनविले होते. साल 2016 मध्ये हा जपानचा तिसरा तर आशियातील 30 वा सर्वात व्यस्त विमानतळ बनला होता.

समुद्राच्या किनाऱ्यांवरील मुंबई, न्यूयॉर्क, कराची सारख्या शहरांना बुडण्याचा धोका वर्तविण्यात आला होता. आता पर्यावरण तज्ज्ञांच्या मते येत्या काही वर्षात जपानचा हा विमानतळ समुद्रा बुडणार आहे. ओसाका शिवाय क्योटो आणि कोबे येथील नागरिकांना देखील हा एअरपोर्ट वाहतूकीसाठी फायदेशीर होता. या विमानतळाचा रनवे 4000 मीटर लांबी आहे. इतर विमानतळाच्या तुलनेत याची धावपट्टी दुप्पटमोठी आहे. बेटावर हा एअरपोर्ट समुद्र किनाऱ्यापासून सुमारे दोन मैल अंतरावर आहे. 1987 मध्ये या एअरपोर्टचे काम सुरु झाले. निर्मितीनंतर सात वर्षात त्याचे काम पूर्ण झाले. निर्मितीनंतर लगेच हा एअरपोर्ट एव्हीएशन हब झाला होता. हा एअरपोर्ट विना वर्दळीच्या निर्जन जागी बनला होता. त्यामुळे येथे 24 तास विमानाची वाहतूक सुरु असूनही कोणताही अडथळा येत नव्हता.

पायासाठी हजारो दगडांचा वापर

लाखो लिटर पाण्याचा उपसा करुन या एअरपोर्टची निर्मिती झाली होती. परंतू निसर्गाच्या पुढे आता कोणाचेही चालणार नाही. परंतू इन्फ्रास्ट्रक्चरची अनोखी निर्मिती असलेला हा विमानतळ येत्या काही वर्षात बुडणार आहे. या एअर पोर्टच्या पायासाठी हजारो दगडांची भर समुद्रात घालण्यात आली होती. यासाठी 80 जहाजातून दगड आणण्यात आले होते. 10 हजार कामगारांनी 10 दशलक्ष तास काम करुन हा अद्भूत एअर पोर्ट तयार केला होता. 30 ते 40 मीटर उंचीचा पाया तयार करुन हा विमानतळ तयार झाला होता. तरीही समुद्राची पातळी वाढत चालल्याने हा विमानतळ बुडणार आहे.