जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती राजीनामा देणार, पण नंतर काय करणार?
अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस हे 2021 च्या तिसऱ्या तिमाहित (Jeff Bezos To Step Down As Amazon CEO) आपल्या पदाचा त्याग करु शकतात.
नवी दिल्ली : अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस हे 2021 च्या तिसऱ्या तिमाहित (Jeff Bezos To Step Down As Amazon CEO) आपल्या पदाचा त्याग करु शकतात. Amazon.com Inc ने दिलेल्या माहितीनुसार, बेजोस त्यांच्या ‘इतर पेन्शन्स’वर फोकस करु इच्छितात. बेजोस यांची जागा अॅमेझॉन वेब सर्व्हिसेजचे (AWS) मुख्य कार्यकारी एंडी जेसी घेऊ शकतात (Jeff Bezos To Step Down As Amazon CEO).
यंदा कंपनीने तिसऱ्यांना रेकॉर्डतोड फायदा मिळवला आणि तिमाही विक्री 130 बिलियन डॉलरपेक्षा जास्त झाली आहे म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 9 लाख 48 हजार 253 कोटी रुपये.
कोण आहेत एंडी जेसी?
त्यासोबतच या प्रश्नाचंही उत्तर मिळणार आहे की, कंपनीत जगातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत माणसाचं पद कोण ग्रहण करेल. 53 वर्षीय जेसी यांनी 1997 मध्ये हावर्ड बिझनेस स्कुलमधून पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी अॅमेझॉनमध्ये आले. त्यांनी अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसची स्थापना केली आणि लाखो लोक याचा वापर केला. तसेच, त्यांनी क्लाऊड प्लॅटफॉर्मही विकसित केले. गेल्या अनेक काळापासून जेसी यांना या पदासाठी दावेदार मानले जात आहे.
जेसी हे टेक्निकल तज्ज्ञ आहेत. त्यांनी नेहमी ओरेकल कॉर्प आणि क्लाउड प्रतिद्वंद्वी मायक्रोसॉफ्ट कॉर्पला चांगली टक्कर दिली. एडब्ल्यूएस विक्रीबाबत ते पुढे आहेत.
अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या एक पत्रात बेजोस म्हणाले, ते अॅमेझॉनच्या मुख्य निर्णय आणि योजनांशी जोडलेले असतील. पण, आता ते आपल्या परोपकारी प्रयत्नांकडे जास्त लक्ष देतील. ज्यामध्ये डे वन फंड, बेजोस अर्थ फंड आणि अंतरिक्ष अन्वेषण आणि पत्रकारितेशी जोडलेल इतर व्यावसायिक गोष्टींमध्ये सहभागी राहतील.
Joe Biden यांची मोठ्या कराराला मंजुरी, भारताला घातक लढाऊ विमानं मिळणार! https://t.co/TNQdS5sY4s #JoeBiden | #India | #America | #FighterAircraft
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 2, 2021
Jeff Bezos To Step Down As Amazon CEO
संबंधित बातम्या :
VIDEO : ‘ती’ व्यायाम करता करता व्हिडीओ बनवत होती, कैद झाली म्यानमार तख्तापलटची संपूर्ण घटना