पवारांइतकेच ‘पावसाळे’ पाहिलेला अमेरिकेचा योद्धा, बायडेन यांच्या सभेत ‘साताऱ्या’च्या सभेचा फील
जो बायडेन प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात संपूर्ण ताकद पणाला लावताना दिसत आहेत. | Joe Biden
न्यूयॉर्क: अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 4 नोव्हेंबरला अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष निवडला जाईल. त्यामुळे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षातील त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात संपूर्ण ताकद पणाला लावताना दिसत आहेत. (Joe biden wraps up Florida rally in pouring rain)
डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन या दोन्ही नेत्यांनी नुकत्याच फ्लोरिडात सभा घेतल्या. यापैकी जो बायडेन यांची सभा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. फ्लोरिडात जो बायडन यांचे भाषण सुरु असताना पावसाला सुरूवात झाली. परंतु त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवले. या सभेनंतर जो बायडेन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला. ‘वादळ संपेल आणि नवीन दिवसाची सुरुवात होईल’, अशी कॅप्शन जो बायडेन यांनी फोटोखाली लिहली आहे. मात्र, पावसाचा जोर वाढल्यानंतर जो बायडेन यांना आपले भाषण आवरते घ्यावे लागले.
WATCH: Joe Biden wraps his drive-in rally on Thursday as rain pours down in Tampa Bay, FL pic.twitter.com/5OFcLUAZW5
— The Hill (@thehill) October 29, 2020
या फोटोची महाराष्ट्रात सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. अनेकजण या फोटोची तुलना शरद पवार यांच्या साताऱ्यातील ऐतिहासिक सभेशी करत आहेत. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवार यांनीही प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यातच साताऱ्यात सभा घेऊन संपूर्ण वातावरण बदलून टाकले होते. शरद पवार यांचे भाषण सुरु असताना अचानक पाऊस सुरु झाला. मात्र, शरद पवार यांनी पावसात न थांबता, न थकता, पावसाच्या धारा परतवून लावत पवारांशी उपस्थितांशी संवाद साधला होता. शरद पवार यांच्या या जिद्दीचे तेव्हा प्रचंड कौतुक झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीत याचा चांगलाच फायदा झाला होता.
This storm will pass, and a new day will come. pic.twitter.com/PewrMRuRXx
— Joe Biden (@JoeBiden) October 30, 2020
संबंधित बातम्या:
“भारत विषारी वायू सोडणारा देश!” पंतप्रधान मोदींच्या मित्राची भारतावर टीका
पायाला जखम, भरपावसात भाषण, पाऊस कोसळला, पवार उदयनराजेंवर बरसले
शरद पवारांची भर पावसात सभा, श्रीनिवास पाटील यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या 2 घोषणा
(Joe biden wraps up Florida rally in pouring rain)