US Election 2020 | जो बायडन यांचा 20 जानेवारीला शपथविधी, अमेरिकेत मतमोजणी सुरुच
अमेरिकेतील प्रक्रियेनुसार जो बायडन यांचा शपथविधी 20 जानेवारी रोजी होणार आहे. जानेवारीमध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निकालाची अधिकृत घोषणा होणारआहे. (Joe Biden will take oath as President of America on 20 January)
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन (Joe Biden) या निवडणुकीत 279 मते घेऊन विजयी झाले आहेत. तर ट्रम्प यांना अवघी 214 मते मिळाली आहेत. या विजयाबरोबरच बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. मात्र, निवडणुकीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. अमेरिकेतील प्रक्रियेनुसार जो बायडन 20 जानेवारी 2021 ला अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. (Joe Biden will take oath as President of America on 20 January)
जो बायडन विजयी झाले असले तरी अमेरिकेत अद्याप मतमोजणी सुरु आहे. विविध राज्यातील मतमोजणीची प्रक्रिया 8 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. भारतासारखी केंद्रीय निवडणूक आयोगाची व्यवस्था अमेरिकेत नसल्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांची घोषणा माध्यमांमधून होत असते. अमेरिकेत राज्य पातळीवर निवडणुका होतात. प्रत्येक राज्याची प्रक्रिया वेगळी असते.
8 डिसेंबरपर्यंत मतमोजणी
अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये 8 डिसेंबरपर्यंत मतमोजणी सुरु राहणार आहे. यावर्षी मतमोजणी प्रक्रियेला अनेक ठिकाणी मतमोजणी प्रक्रियेला कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. 538 इलेक्ट्रोल कॉलेजचे निकाल तयार केले जातील त्यानंतर ते अधिकृत रित्या अमेरिकेच्या काँग्रेसकडे सोपवले जातील.
अधिकृतपणे निकालांची घोषणा अमेरिकेच्या काँग्रेसचे अधिवेशन येत्या जानेवारी महिन्यात 6 तारखेला आयोजित केले जाईल. विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स अधिकृतपणे निवडणुकीचे निकालांची घोषणा करतील.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची पाहायला मिळाली. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांनी प्रचार अभियान जोरदार राबवले. 3 नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर तीन दिवस मतमोजणी झाल्यानंतर जो बायडन यांनी विजयासाठी आवश्यक असणारी संख्या 270 पार केली.
“अमेरिकेसारख्या महासत्ताधीश देशाचं नेतृत्व करण्याची अमेरिकेच्या जनतेने मला संधी दिली. अमेरिकन जनतेने केलेला हा माझा सन्मान आहे. जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. तुमचा विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेन”, असं ट्विट करत निकालानंतर जो बायडन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस विजयी झाल्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या कमला हॅरिस पहिल्या महिला उपराष्ट्रपती ठरल्या आहेत. कमला हॅरिस यांनी विजयाचे श्रेय त्यांच्या आई श्यामला गोपालन यांना दिले आहे.
संबंधित बातम्या :
जो बायडन अमेरिकेचे नवे अध्यक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव; अमेरिकेत नव्या पर्वाला सुरुवात!
ट्रम्प समर्थकांनो झालं गेलं विसरुन जा, एकमेकांना नवी संधी देऊयात: जो बायडन
(Joe Biden will take oath as President of America on 20 January)