Telegram च्या सीईओचा बाजार उठवणारी 24 वर्षांची ही ‘मिस्ट्री वुमन’ कोण? क्रिप्टो प्लेअर की मोसादची एजंट?
व्हॉट्सअपला टक्कर देणारे आणि रशियाचे मार्कझुकर बर्ग म्हटले जाणाऱ्या टेलिग्रामचे संस्थापक पावेल ड्यूरोव यांच्या अटके मागे एक मिस्ट्री गर्ल असल्याचे म्हटले जात आहे. नक्की काय आहे हे प्रकरण ...
टेलिग्रामचे सह संस्थापक आणि सीईओ पावेल ड्युरोव ( Pavel Durov ) यांना पॅरीसमध्ये शनिवारी पॅरीसमध्ये अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर टेलिग्राम या मॅसेजिंग साईटवरुन क्रिमिनल कंटेट पसरविण्याचा आरोप आहे. या शिवाय आणखीन काही आरोप देखील ठेवण्यात आले आहेत. रशियाचे ‘मार्क झुकरबर्ग’ म्हटले जाणारे पॉवले ड्युरोव अनेक वर्षांपासून पाश्चिमात्य देशांच्या निशाण्यावर होते. ते पॅरीसच्या बार्गेट विमानतळावर प्रायव्हेट जेटवरुन उतरताच त्यांना अटक करण्यात आली आहे. पावेल यांच्या सोबत यावेळी ज्युली वावीलोवा ( Juli Vavilova ) नावाची तरुणी देखील होती. तिला फ्रान्सच्या पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. आता या ज्युलीमुळेच पावेल यांना अटक करण्यात पाश्चात्य तपास यंत्रणांना यश आल्याचे म्हटले जात आहे. ज्युलीबद्दल आता निरनिराळे दावे केले जात आहेत कोण आहे ही 24 वर्षांची ‘मिस्ट्री वुमेन’ ?
कोण आहे ही ‘मिस्ट्री वुमेन’
ज्युली वावीलोवा (Juli Vavilova) हीच्या इंस्टाग्राम प्रोफाईलनूसार ती 24 वर्षांची असून दुबई बेस्ड क्रिप्टो कोच आहे. ज्युलीने आपल्या इंस्टा बायोत तिला गेमिंग, क्रिप्टो करन्सी आणि विविध भाषांमध्ये रस असल्याचे म्हटले आहे. तिला इंग्रजी,रशियन आणि अरबी यांसारख्या भाषा मुखोद्गत आहेत. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील पोस्ट केलेले फोटो पाहाता टेलिग्रामचे फाऊंडर पावेल ड्युरोव आणि तिच्यात भलतीच जवळीक दिसत झालेली दिसत आहे. ज्युलीच्या प्रोफाईलवर दोघांचे अनेक फोटो आहेत. कजाकिस्थान, किर्गीस्थान पासून अझरबैझान सारख्या देशात ते एकत्र दिसत आहेत. या फोटोवरुन दोघांत गहरी मैत्री किंवा जवळीक दिसत आहे. परंतू ते रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही हे समजू शकलेले नाही.
काय-काय थिअरी सुरु आहेत ?
पावेल ड्यूरोव (Pavel Durov) यांना झालेल्या अटकेमागे अनेक थिअरी समोर येत आहेत. एका थिअरीनूसार ज्युलीने त्यांना हनी ट्रॅपमध्ये फसवून फ्रान्सला नेले तर नाही ना ? असा संशय आहे. ज्युली ही एका गुप्तहेराप्रमाणे वागत होती असा दावा केला जात आहे. जेथे जेथे ती पावेल यांच्यासोबत गेली तेथील फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. एक प्रकारे ती पावेल यांचे ठिकाण अथोरिटीजना कळवीत असावी अशी शंका व्यक्त होत आहे. तर दुसऱ्या थिअरीनूसार ज्युली देखील पोलिसांच्या रडारवर होती. तिच्या अटकेमुळेच पावेल सुद्धा आयतेच तपास यंत्रणांच्या तावडीत सापडल्याचे देखील म्हटले जात आहे.
शंकास्पद वावर
ज्युली ही इस्रायलच्या मोसाद संघटनेची गुप्तहेर असू शकते. ती पाश्चिमात्य राष्ट्राच्या कटकारस्थानात सामील असू शकते. कारण पाश्चिमात्य राष्ट्रांना पावेल यांनी कसेही करुन पकडाचे होते. ज्युलीवर शंका येण्यामागे मोठे कारण आहे. कारण तिची पार्श्वभूमी कोणालाच माहिती नाहीए…पावेल जेव्हा रशिया सोडून दुबईला शिफ्ट झाले तेव्हा ज्युली अचानक त्यांच्या संपर्कात कशी काय आली ? आणि लागलीच त्यांच्या इतक्या जवळ कशी गेली ? यावर शंकेच्या जाळे निर्माण झाले आहे.