Khalistani Terrorist : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडात गोळ्या घालून हत्या, 10 लाखांचे बक्षीस…
Hardeep Singh Nijjar : कॅनडामध्ये खलिस्थानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. भारत सरकारने त्याला आतंकवादी घोषित केलं होतं. विशेष म्हणजे एनआयएने त्याच्यावर १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
नवी दिल्ली : कॅनडामध्ये (Canada) खलिस्थानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची (Khalistani terrorist Hardeep Singh Nijjar) गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्याला भारत सरकाने दहशतवादी घोषित केलं होतं. भारत सरकाने काही दिवसांपूर्वी ४१ आतंकवाद्यांची एक यादी जाहीर केली होती. त्यामध्ये हरदीपसिंग निज्जर (wanted in India) याचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, हरदीपसिंग निज्जर याला कॅनडा येथील सुरी भागात गोळी मारण्यात आली. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. तो कॅनडातील शीख संघटनेशी संबंधित होता. तो पंजाब राज्यातील जालंधर जिल्ह्यातील रहिवासी होता. ही घटना समजल्यानंतर भारतातील तपास यंत्रणा कॅनडाच्या तपास यंत्रणांकडून संपूर्ण घटनेची माहिती जमा करीत आहे.
तो मागच्या वर्षापासून कॅनडामध्ये राहत होता. त्याचबरोबर तिथून भारताविरुद्ध खलिस्तानी दहशवाद्यांना खतपाणी घालत होता.
मागच्या वर्षात हरदीपसिंग निज्जर हा भारतातील तपास यंत्रणांसाठी आणखी मोठी डोकेदुखी बनला होता. कारण तो दुसऱ्या टोळीना मदत करु लागला होता. त्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीतील लोकांना पैसा आणि माहिती पुरवण्यास सुरुवात केली होती.
काही दिवसांपूर्वी भारत सरकारने एक दहशतवाद्यांची यादी जाहीर केली होती. त्या ४१ जणांच्या यादीत हरदीपसिंग निज्जर याचा सुध्दा समावेश करण्यात आला होता. हरदीपसिंग निज्जर याच्या जवळच्या दोन साथीदारांना मागच्या काही महिन्यांपूर्वी फिलिपाइन्स आणि मलेशियातून ताब्यात घेतलं होतं.
पुजारी हत्येचा त्याच्यावर आरोप
गेल्यावर्षी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पंजाब राज्यातील जालंधर येथील एका पुजाऱ्याचा कट रचल्यामुळे फरारी खलिस्थानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांच्यावरती दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणण्यानुसार पुजारी हत्येचा कट हा खलिस्तान टायगर फोर्सने यांच्याकडून रचण्यात आला होता. त्यावेळी कॅनडामध्ये निज्जर लिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख होता.