Russia-Ukraine War : कोण आहे ‘ही’ शस्त्रधारी युक्रेनी महिला? जीची सोशल मीडियावर सुरूये जोरदार चर्चा
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असतानाच अचानक एका बंदुकधारी युक्रेनी महिलाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायर झाले आहेत. तसेच या महिलाच्या नावाची देखील चर्चा होऊ लागली आहे. या महिलेने हातात बंदुक घेतली आहे, तसेच तिच्याकडे मोठ्याप्रमाणात बुलेटचा साठा असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.
Russia Ukraine War : रशिया (Russia ) युक्रेन ( Ukraine) वाद सिगेला पोहोचला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. (Russia Ukraine War ) या हल्ल्यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर अत्यंत वेगात घडामोडी घडताना दिसून येत आहेत. युक्रेनदेखील शस्त्रसज्ज आणि प्रशिक्षीत सैन्यदल असलेला देश आहे. 140 देशांच्या पावर इंडेक्स लिस्टमध्ये रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे तर युक्रेन 22 व्या नंबरवर. दोनही देशांकडे मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा आणि सैन्यदल आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असतानाच अचानक एका बंदुकधारी युक्रेनी महिलाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायर झाले आहेत. तसेच या महिलाच्या नावाची देखील चर्चा होऊ लागली आहे. या महिलेने हातात बंदुक घेतली आहे, तसेच तिच्याकडे मोठ्याप्रमाणात बुलेटचा साठा असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. ही महिला नेमकी कोण आहे? काय करते जाणून घेऊयात.
सैन्य प्रशिक्षणाची आवड
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे नाव अलीसा असे आहे. ती युक्रेनची राजधानी कीवमध्ये राहाते. अलिसाचे वय 38 वर्ष असून, तिला एका सात वर्षांचा मुलगा देखील आहे. अलिसा ही दीड वर्षांसाठी युक्रेनच्या प्रादेशिक सुरक्षा दलामध्ये भरती झाली आहे. सोबतच अलिसा ही सायबर सुरक्षा तज्ज्ञ देखील आहे. अलिसाने आपल्या जॉबसोतबच शस्त्र चालवण्याचे तसेच शुटींगचे प्रशिक्षण घेतले आहे. तीने युक्रेनचे सैन्य प्रशिक्षण देखील पूर्ण केले आहे. त्यानंतर ती दीड वर्षासाठी युक्रेनच्या प्रादेशिक सुरक्षा दालामध्ये भरती झाली. माला असे कधीच वाटत नाही की रशिया आणि युक्रेनचे युद्ध व्हावे, कारणे कोणतेही युद्ध मानवाला विनाशाकडे नेते असे अलिसाने म्हटले आहे. हे युद्ध व्हावे अशी तिची बिलकूल इच्छा नसल्याचे ती सांगते. युक्रेनची सैन्य ट्रेनिंग अतिशय कठिण असते. मात्र अलिसाने ही ट्रेनिंग पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून सहज पूर्ण केली आहे.
50 पेक्षा अधिक देशात प्रवास
रॉयटर्सने केलेल्या दाव्यानुसार अलीसाला बाईक देखील चालवायला आवडते. तीने बाईकवरून तिच्या पतीसोबत 50 पेक्षा अधिक देशात प्रवास केला आहे. जेव्हा जेव्हा मी फ्री असते तेव्हा आम्ही बाईकवरून दूरवर फिरायला जातो असे तीने सांगितले. जेव्हा मी निराश असते किंवा अतिरिक्त कामामुळे माझ्या मनावर तणाव येतो अशा वेळी मी काही दिवसांची सुटी काढून पर्यटनाचा आनंद घेते असे अलीसाने म्हटले आहे.
संबंधित बातम्या
Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धावरच्या भारतीय भूमिकेवर अमेरिका नाराज, बायडेन यांना काय हवे?
रशिया-युक्रेन युद्धाचा महाराष्ट्रालाही फटका, एमबीबीएसे विद्यार्थी अडकले, पालकांना घोर