झोंगडोंग : द केव स्कूल : चीनमध्ये असलेल्या या शाळेत जवळपास 186 विद्यार्थी आहेत. यात 8 शिक्षक शिकवण्याचं काम करतात. मात्र, ही शाळा कोणत्याही इमारतीत भरत नाही, तर थेट नैसर्गिक गुहेत भरत होती. या शाळेची सुरुवात 1984 मध्ये झाली. जी मुलं शाळेत येऊ शकत नसायची त्यांना येथे शिकवलं जात. मात्र, 2011 मध्ये चीन सरकारने ही शाळा बंद केली.
द कार्पे डियम स्कूल: ही शाळा ओहिओमध्ये आहे. या शाळेत वर्गखोल्यांऐवजी एखाद्या ऑफिससारखे जवळपास 300 क्युबिकल आहेत. प्रत्येकाने आपल्या स्तरावरच गोष्टी शिकल्या पाहिजे असं या शाळेचं म्हणणं आहे. जर मुलांना काही गोष्टींमध्ये अडचण आली तर तिथं असलेले शिक्षक त्यांना येऊ मदत करतात.
जगातील आगळीवेगळी शाळा.
द स्कूल ऑफ सिलिकॉन व्हॅली : ही शाळा परंपरागत शिकवण्याच्या पद्धतीच्या विरोधात आहे. येथे मुलांच्या शिक्षणासाठी उच्च स्तरावरील तंत्रज्ञान वापरलं जातं. येथे विद्यार्थ्यांना आय पॅड, थ्री-डी मॉडलिंग आणि संगीताच्या मदतीने शिकवलं जातं.
सडबरी स्कूल : ही शाळा अमेरिकेत आहे. या शाळेत मुलं स्वतःचं आपलं वेळापत्रक बनवतात. आपल्याला कोणत्या दिवशी कशाचा अभ्यास करायचा हेही तेच ठरवतात. या शिवाय त्यांना कोणत्या पद्धतीने शिकवलं पाहिजे आणि स्वतःचं मुल्यमापन कसं करायचं हेही विद्यार्थीच ठरवतात.