अफगाणिस्तानमध्ये तांडव, 10 प्रमुख शहरांवर कब्जा, तालिबान पुन्हा सत्तेत येणार?

| Updated on: Aug 14, 2021 | 11:10 AM

अफगाणिस्तान मागील अनेक दशकांपासून अशांत देश म्हणूनच ओळखला जातोय. या देशातील सर्वसामान्य नागरिकांचं आयुष्या कायमच्याच युद्धजन्य परिस्थितीमुळे होरपळून निघालं आहे. त्यामुळे मुलभूत गरजांचाही तुटवडा निर्माण झालाय.

अफगाणिस्तानमध्ये तांडव, 10 प्रमुख शहरांवर कब्जा, तालिबान पुन्हा सत्तेत येणार?
Follow us on

काबूल : अफगाणिस्तान मागील अनेक दशकांपासून अशांत देश म्हणूनच ओळखला जातोय. या देशातील सर्वसामान्य नागरिकांचं आयुष्या कायमच्याच युद्धजन्य परिस्थितीमुळे होरपळून निघालं आहे. त्यामुळे मुलभूत गरजांचाही तुटवडा निर्माण झालाय. याची कारणं इतिहासात आहेत. जगातील प्रत्येक महासत्तेने अफगाणिस्तानवर नियंत्रणाचा प्रयत्न केला आणि या महासत्तांचा सपशेल पराभव झाला. याची सुरुवात अगदी जगजेत्या सिकंदर महानपासून झाली. एका वर्षात जगाचा मोठा भूभाग जिंकणाऱ्या सिकंदरला त्या तुलनेत लहान अफगाणिस्तान जिंकायला तब्बल 3 वर्षांपेक्षा अधिक काळ लागला. मात्र, जिंकूनही त्यांना फार काळा अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवता आलंच नाही. हाच अनुभव अगदी ज्यांचा सूर्य कधीच मावळला नाही अशा ब्रिटिशांनाही आला.

“अखेर सोव्हिएत युनियनची माघार”

 

नंतरच्या काळात जगाची महासत्ता म्हटल्या जाणाऱ्या तत्कालीन सोव्हिएत युनियनने देखील सैन्य कारवाई करत अफगाणिस्तानवर राज्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तसं फार काळ करणं शक्य झालं नाही. अखेर सोव्हिएत युनियनला माघार घ्यावी लागली. त्यानंतर सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि रशियाची निर्मिती झाली.

तालिबान राज्यात अफगाणमध्ये शरिया कायदा

यानंतर अफगाणिस्तानला मिळणारी रशियाची पूर्ण मदत बंद झाली आणि तालिबानने अफगाणवर पूर्ण कब्जा केला. याच काळात या देशात शरिया कायदा लागू करण्यात आला. यामुळे स्त्रीयांवर जबर निर्बंध लादण्यात आले. स्त्रीयांचं काम बंद करण्यात आलं, बुरखा बंधनकारक केला आणि पुरुषाशिवाय घराबाहेर पडणंही बंद केलं. तालिबानने 1996 ते 2001 या काळात संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवलं.

30 वर्षे प्रयत्न करुनही अमेरिकेला तालिबानचा नायनाट करता आला नाही

दरम्यान, अफगाणिस्तानमधील कट्टरवादी गट अल-कायदाने अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 9/11 चा हल्ला केला आणि यात अमेरिकेनेही उडी घेतली. अमेरिकेने अल-कायदाला धडा शिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सैन्य उतरवलं. यानंतर अमेरिकन सैन्याने तालिबानला राजधानी काबूलमधून हाकललं, मात्र, मागील 30 वर्षे प्रयत्न करुनही अमेरिकेला तालिबानचा पूर्ण नायनाट करता आला नाही.

अखेर 2020 मध्ये अमेरिकेलाही तालिबानसोबत करार करुन हे युद्ध संपवण्याची भूमिका घ्यावी लागली. यात तालिबानने परदेशी नागरिकांना नुकसान न करण्याचं आणि अफगाण नागरिकांच्या अधिकारांचं संरक्षण करण्याचं कुबल केलं.

आता मात्र, अमेरिकेने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतलाय आणि हीच संधी साधून तालिबान शक्य तेवढा भूभाग आपल्या नियंत्रणात घेत आहेत. आतापर्यंत तालिबानने 34 पैकी 10 प्रांतिय राजधान्या जिंकल्या आहेत. त्यामुळे आगामी 3 महिन्यात तालिबान संपूर्ण अफगाणवर कब्जा करेल, अशी शक्यता अमेरिकेच्याच गुप्त विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे एकूणच अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबान राज्य येणार हे स्पष्ट झालंय.

हेही वाचा :

अफगान बनलं युद्धभूमी, भारतीयांना करणार ‘एअरलिफ्ट’; मजार-ए-शरीफहून दिल्लीसाठी उडालं स्पेशल विमान

“आधी गोळ्या झाडल्या, मग फरफटत नेलं आणि गाडीखाली चिरडलं”, पत्रकार दानिश सिद्दीकींच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा

व्हिडीओ पाहा :

Know all about historical incidents of Taliban Afghanistan America and Russia