जेरुसलेम : इस्राईलने उत्तर गाझा भागात शुक्रवारीही (14 मे) पहाटे जोरदार गोळीबार केला. दुसरीकडे जेरुसलेम वाचवल्याचा दावा करणाऱ्या हमास या मुस्लीम कट्टरतावादी संघटनेने इस्राईलवर लांब पल्ल्याच्या रॉकेट्सचा मारा केला. त्याला प्रत्युत्तर देत इस्राईलने जोरदार हवाई हल्ले केले. इस्त्रायली सैन्याच्या या गोळीबार आणि हवाई हल्ल्यात गाझा परिसरात अनेक लोकांचा मृत्यू झाला. अनेक पॅलेस्टाईन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला (Know all about Israel Palestine Hamas attack and possibility of war).
विशेष म्हणजे इस्राईलने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इस्राईलने मुस्लीम कट्टरवादी संघटना हमास विरुद्ध लढा देण्याची घोषणा केलीय. त्याचाच भाग म्हणून इस्राईलने गाझा सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात केलेत. याशिवाय अतिरिक्त 9000 सैनिकांना देखील युद्धासाठी तयार रहायला सांगितलंय. पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी 1,800 रॉकेट फेकले आणि सैन्याने 600 हवाई हल्ले केले.
“Hello world … My family and I are under the target of the bombing of the Israeli occupation’s artillery and warplanes.”
Palestinians in Gaza recount the ‘ruthless’ horrors of Israeli raids https://t.co/tWGFo4UaCA pic.twitter.com/2fCRQXul7S
— Al Jazeera English (@AJEnglish) May 14, 2021
इस्राईलने युद्धासाठी दंड थोपटले आहेत. 14 मे रोजी इस्राईलने उत्तर गाझा भागात मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. याशिवाय मोठ्या प्रमाणात हवाई हल्लेही केले. या हल्ल्यानंतर या भागातील पॅलेस्टाईनचे नागरिकांना आपली मुलं आणि महत्त्वाचं सामान घेऊन हा परिसर आणि आपली घरं सोडावे लागले. इस्राईलच्या हल्ल्यात गाझा परिसरात अनेक निरपराध लोकांचेही जीव गेले. एका ठिकाणी तर एकाच कुटुंबातील 6 जण घरातच मृत्यू पावले. इस्राईलने कट्टरतावादी संघटना हमाससोबत लढण्यासाठी गाझा सीमेवर मोठ्या संख्येने सैन्य पाठवले आहे. याव्यतिरिक्त, 9,000 सैनिकांना युद्धासाठी तयार राहण्यास सांगितले.
#UPDATE Germany on Friday said rockets fired by Hamas at Israel amounted to “terrorist attacks” and condemned “anti-Semitic” demonstrations on its own soil as the conflict intensified in the Middle Easthttps://t.co/q5GUv9gcns pic.twitter.com/Qb2yC65yzk
— AFP News Agency (@AFP) May 14, 2021
#AFP Pictures of the week (May 8-14)https://t.co/JipJ8xcl7E pic.twitter.com/JwfFoRwVbf
— AFP Photo (@AFPphoto) May 14, 2021
सध्या गाझा परिसर हमासच्या ताब्यात आहे. त्याचबरोबर इस्राईली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हे युद्ध सुरुच ठेवणार असल्याचं म्हटलंय. ते म्हणाले, आम्ही हमासला याची मोठी किंमत मोजायला लावू असं आधीच सांगितलं होतं. त्याप्रमाणेच आम्ही कारवाई करतोय. आम्हीही तेच करत आहोत. हमास कट्टरतावादी संघटनेकडून जवळपास 1800 रॉकेट डागण्यात आलेत. याला प्रत्युत्तर म्हणून इस्राईली सैन्याने 600 हून अधिक हवाई हल्ले केले. त्यात गाझातील किमान 3 इमारती जमिनदोस्त झाल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्ध थांबवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, यानंतरही इस्राईल आणि हमास यांच्यात युद्ध सुरुच आहे.
#AFP Pictures of the week (May 8-14)https://t.co/JipJ8wUKg6 pic.twitter.com/8eYHOmecGS
— AFP Photo (@AFPphoto) May 14, 2021
सलग चौथ्या रात्री इस्राईलमध्ये जातीय हिंसाचार झाल्यानंतर ही लढाई तीव्र झाली. लौद शहरात ज्यू व अरब गटात चकमक झाली. पोलिसांची तैनाती वाढविण्याचे आदेश देऊनही हा संघर्ष झाला. गाझा शहराच्या बाहेरील भागात झालेल्या स्फोटांमुळे आकाशात धूर दिसत आहे. उत्तर गाझा पट्टीवर इस्त्रायली हल्ल्यात रफत तनानी, त्याची गरोदर पत्नी आणि 4 मुलांनी जीव गमावला. हल्ला झाल्या तेव्हा रफत आणि त्याचे कुटुंब झोपायला जात असल्याचे रफाटचा भाऊ फदी यांनी सांगितले. या हल्ल्यात इमारतीचे मालक आणि त्यांची पत्नीनेही आपला जीव गमावला.
WARNING: GRAPHIC CONTENT – The violence between Israeli forces and Palestinian militants entered a fifth day, with fresh air strikes and artillery fire https://t.co/ohI0FjmK1m pic.twitter.com/Zr9otT9Edr
— Reuters (@Reuters) May 14, 2021
सोमवारी (10 मे) हे युद्ध सुरु झालं. तेव्हा हमासने जेरुसलेमला वाचवल्याचा दावा करत लांब पल्ल्याच्या रॉकेट्स मारा केला. त्याला इस्राईलने अनेक हवाई हल्ले करत प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर इस्राईलने गाझामधील शेकडो ठिकाणांना लक्ष्य केलं आहे. गाझा अतिरेक्यांनी इस्राईलमध्ये जवळपास 2000 रॉकेट गोळीबार केल्यामुळे देशाच्या दक्षिणेकडील भागात ठप्प झाला आहे.
या हल्ल्यांमध्ये 119 लोक ठार झाल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलंय. यामध्ये 31 मुलं आणि 19 महिलांचा समावेश आहे. 830 लोक जखमी झाले आहेत. हमासने आपले 20 लोक मारले गेल्याला दुजोरा दिलाय. मृतांची संख्या प्रत्यक्षात यापेक्षाही संख्या अधिक आहे. इस्राईलमध्येही 7 जणांचा मृत्यू झाला, यामध्ये 6 वर्षाचा मुलगा आणि सैनिकांचा समावेश आहे.
हेही वाचा :
Israel Palestine: हमासने डागलेली 100 रॉकेटस् इस्रायलकडून हवेतच नष्ट
सौम्या संतोष पतीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होती, हमासनं डागलेलं क्षेपणास्त्र घरावर पडताच सगळं संपलं
व्हिडीओ पाहा :
Know all about Israel Palestine Hamas attack and possibility of war