भारतात Corona Vaccine ‘मोफत’ तरीही लोक दुबईला का जातात? प्रवासासाठी चार्टर्ड प्लेनचा खर्च 35 ते 55 लाख रुपये

भारतात सरकारी लसीकरण केंद्रांवर कोरोनाची लस मोफत दिली जात आहे. मात्र, तरीही भारतातील श्रीमंत लोक कोरोना लस (Corona vaccine) घेण्यासाठी दुबईला जात आहेत.

भारतात Corona Vaccine ‘मोफत’ तरीही लोक दुबईला का जातात? प्रवासासाठी चार्टर्ड प्लेनचा खर्च 35 ते 55 लाख रुपये
दुबई
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 1:36 AM

दुबई : भारतात सरकारी लसीकरण केंद्रांवर कोरोनाची लस मोफत दिली जात आहे. मात्र, तरीही भारतातील श्रीमंत लोक कोरोना लस (Corona vaccine) घेण्यासाठी दुबईला जात आहेत. यासाठी ते 35 ते 55 लाख रुपयांपर्यंतचा खर्च करुन चार्डर्ड प्लेनने दुबईचा प्रवास करतात. भारतात मोफत कोरोना लस असतानाही हे लोक दुबईला का जात आहेत असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार आहे. याच उत्तराचा शोध घेण्याच्या निमित्ताने या श्रीमंत भारतीयांच्या या दुबईचा प्रवास करुन वेगळी कोरोना लस घेण्याचा हा खास आढावा (Know all about why Indians going to Dubai amid free vaccination in India Pfizer Vaccine).

भारतातील धनाढ्य लोक खास फायजर (Pfizer) कोरोना लस घेण्यासाठी दुबईला जात आहेत. संयुक्त अरब अमीरातमध्ये (UAE) फायजर (Pfizer) सह चिनची सायनोफार्म लस आणि ब्रिटेनची एस्ट्राजेनेका लस मिळते. यापैकी भारतातील श्रीमंत लोक फायझरला अधिक पसंती देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दुबईत 40 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांना मोफत लस देण्यात येतेय.

दुबईत कुणाकुणाला कोरोना लस घेण्याची परवानगी?

दुबईत सर्वच भारतीयांना कोरोना लसीकरणाची परवानगी नाहीये. ज्या भारतीय नागरिकांकडे दुबईचा रेसिडंट व्हिजा आहे त्यांना लसीकरणासाठी नोंदणी करता येते. अशाप्रकारे भारतातून दुबईला जाऊन कोरोना लस घेण्याच्या या ट्रेंडची सुरुवात मार्चमध्ये झाली. आता एप्रिलमध्ये कोरोना लस घेण्यासाठी चार्टर्ड फ्लाईटने दुबईला जाणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढलीय.

चार्टर्ड ऑपरेटर्स आणि दुबईत लस घेणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोक कोरोना लसीचे दोन्ही डोस घेण्यासाठी पहिल्या डोसनंतर दुबईतच थांबत आहेत. दुसरीकडे काही लोक पहिला डोस घेऊन पुन्हा भारतात येत आहेत. दुसरा डोस घेण्यासाठी ते पुन्हा चार्टर्ड प्लेनने दुबईला जात आहेत. फायजर कोरोनाच्या दोन्ही डोसमध्ये जवळपास 3 आठवड्यांचं अंतर आहे.

एका व्यक्तीचा कोरोना लसीचा खर्च 35 ते 55 लाख रुपये

दुबईत जाऊन फायझरची कोरोना लस घेण्याचा एका व्यक्तीचा खर्च तब्बल 35 ते 55 लाख रुपये इतका आहे. यात चार्टर्ड फ्लाईटने भारतातून दुबईला जाणे आणि दुबईतून पुन्हा भारतात येण्याचा समावेश आहे. हा खर्च वाढूही शकतो. हे सर्व चार्टर्ड ऑपरेटर, दुबईमध्ये राहण्याचा कालावधी आणि प्रवाशांची संख्या यावर अवलंबून आहे. सामान्यपणे ज्या भारतीय नागरिकांचा व्यवसाय दुबईत नोंदणी झालेला आहे त्यांच्या जवळच दुबईचा निवास व्हिसा आहे.याशिवाय काही इतर व्यावसायांनाही निवासी व्हिसा मिळतो.

भारतात सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये आणि आरोग्य केंद्रांवर कोरोना लस मोफत उपलब्ध आहे. खासगी रुग्णालयांमध्ये याची किंमत केवळ 250 रुपये आहे.

फायझर कोरोना लसीलाच प्राधान्य का?

दुबईचा निवासी व्हिसा असलेल्या एका मोठ्या कॉरपोरेट मॅनेजरने मार्चमध्ये दुबईत फायझरची कोरोना लस घेतली होती. ते भारतातही कोरोना लस घेऊ शकले असते. मात्र, त्यांनी तसं न करण्याबाबत बोलताना ते म्हणाले, “फायझर कोरोना लसीची अधिक तपासणी करुन तयार झालीय. त्यामुळे ती अधिक सुरक्षित आहे असं मला वाटतं. मी एक खासगी जेट घेतलं आणि पत्नीसोबत 20 दिवस पत्नीसोबत राहिलो.”

हेही वाचा :

लसीकरणाचा वेग वाढवा; मनमोहन सिंगांचे मोदी सरकारला 5 सल्ले

Corona Vaccination in India : केंद्र सरकारचा 100 टक्के लसीकरणासाठी मास्टर प्लॅन, वाचा काय आहे रणनीती?

आमच्या मागणीचा विचार केला आभार, आता लसीचा पुरवठा वेळच्यावेळी होईल अशी अपेक्षा : उद्धव ठाकरे

व्हिडीओ पाहा :

Know all about why Indians going to Dubai amid free vaccination in India Pfizer Vaccine

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.