Sunita Williams : सुनीता विल्यम्सचं शिक्षण किती? नौदलातून थेट अंतराळवीर कशी बनली?; ‘या’ गोष्टी तुम्हालाही…

अवकाश गंगेतील रहस्य शोधून काढण्यासाठी अंतराळात गेलेली सुनीता विल्यम्स अंतराळात अडकली आहे. आठ दिवसाचं मिशन होतं. पण आता तिला पृथ्वीवर यायलाच वर्ष जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनाच सुनीताची काळजी वाटत आहे. सुनीता नेमकी कोण आहे? तिचं शिक्षण काय झालंय? ती अंतराळवीर कशी बनलीय? याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे.

Sunita Williams : सुनीता विल्यम्सचं शिक्षण किती? नौदलातून थेट अंतराळवीर कशी बनली?; 'या' गोष्टी तुम्हालाही...
सुनीता विल्यम्सचं शिक्षण किती?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 27, 2024 | 1:40 PM

Who is Sunita Williams : अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळातील आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर अडकली आहे. आठ दिवसाच्या मिशनवर गेलेल्या सुनीताला आता परत येण्यासाठी किमान एक वर्ष उलटणार आहे. या काळात तिच्याबाबत काहीही घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो असं सांगितलं जातं. त्याला कारण म्हणजे अंतराळात तिच्याकडे असलेला ऑक्सिजनचा साठा केवळ तीन महिन्याचा आहे, म्हणजे 90 दिवसांचाच आहे. त्यामुळे सर्वांनाच तिची काळजी लागली आहे. या निमित्ताने सुनीताबाबतच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. तिचं शिक्षण किती झालं? तिने कुठून शिक्षण घेतलं? ती ॲस्ट्रोनॉट कशी बनली? अशा गोष्टी गुगलवर चांगल्याच सर्च केल्या जात आहेत.

कोण आहे सुनीता?

सुनीता विल्यम्स ही भारतीय वंशाची अंतराळवीर आहे. ती अमेरिकेच्या नौदलात अधिकारी म्हणूनही कार्यरत आहे. अमेरिकेत सुनीता विल्यम्सला सुनी या नावाने ओळखतात. तर स्लोव्हेनियामध्ये तिला सोन्का म्हणून हाक मारली जाते, हे खूप कमी लोकांना माहीत असेल. अंतराळात सर्वाधिक काळ राहिलेली ती अंतराळवीर आहे. तसेच स्पेसवॉक करणारी ती पहिली महिलाही आहे.

हे सुद्धा वाचा

सुनीता विल्यम्स भलेही अमेरिकीची नौदल अधिकारी असेल, ती अंतराळवीरही असेल पण तिचं भारताशी घट्टं नातं आहे. तिचे आईवडील भारतातील रहिवासी होते. सुनीताचे वडील दीपक पंड्या गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्याचे रहिवााशी होते. ते न्यूरो एनाटोमिस्ट होते. सुनीताची आई उर्सुलाइन बोनी पंड्या या स्लोव्हेनिया-अमेरिकेची होती. 1958मध्ये सुनीता विल्यम्सच्या वडिलांनी अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. ते अहमदाबादेतून अमेरिकेत गेले. सुनीताला तीन भाऊ आणि बहीण आहेत.

शिक्षण कुठे घेतलं?

सुनीता विल्यम्सने 1983मध्ये नीधम हायस्कूलमधून पदवी घेतली. त्याशिवाय 1987मध्ये यूनायटेड स्टेट्स नेव्हल अकादमीतून फिजिकल सायन्समध्ये बॅचलर ऑफ सायन्सची पदवी घेतली. त्यानंतर 1995मध्ये तिने फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मास्टर ऑफ सायन्सची डिग्री घेतली.

नौदलात भरती झाली

सुनाता विल्यम्स नंतर अमेरिकेच्या नेव्हीमध्ये भरती झाली. नेव्हीत तिने अनेक पदांवर काम केलं. सहा महिने तिने नेव्हल कोस्टल अकादमीत तात्पुरता जॉब केल्यानंतर बेसिक डायव्हिंग ऑफिसरच्या पदावर तिची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ती नेव्हल ट्रेनिंग कमांडमध्ये गेली. तिथे तिने 1989पर्यंत एव्हिएटर म्हणून काम केलं.

कशी बनली ॲस्ट्रोनॉट

सुनीत विल्यम्स अमेरिकन नौसेनेत कार्यरत होती. त्या दरम्यान जून 1998मध्ये ॲस्ट्रोनॉट म्हणून तिची निवड करण्यात आली. त्यानंतर तिला ट्रेनिंग देण्यात आली. ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तिने रशियन अंतराळ एजन्सीमध्ये काम केलं. तिची अंतराळ यात्रा येथूनच सुरू झाली. सुनीता पहिल्यांदा 2006मध्ये अंतराळात झेपावली. 2012पासून नासासोबत आंतरराष्ट्रीय स्पेस मिशनही तिने सुरू केलं.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.