Twitter Logo : उड गया पंछी; Twitter च्या लोगोत बदल ; Elon Musk ने का केली Doge ची निवड ?
सकाळी उठल्यावर अनेकांनी ट्विटर ओपन केल्यावर त्यात बदल दिसला. आता ट्विटरचा लोगो बदलला आहे. हा बदल नेमका कधी आणि का झाला, सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया.
नवी दिल्ली : ‘ट्विटर’ ही (twitter) मायक्रो-ब्लॉगिंग साइट आता थोडी वेगळी दिसू लागली आहे, कारण त्यांचा निळा पक्षी (blue bird)उडून गेला आहे. आणि त्याजागी येऊन बसला आहे एक श्वान म्हणजेच कुत्रा. ट्विटरने आपला ‘ब्लू बर्ड’ लोगो बदलून ‘डॉज’ केला आहे. हा कुत्रा कोण आहे आणि मस्कने ट्विटर लोगो म्हणून हा कुत्रा का निवडला? असे अनेक प्रश्न आता लोकांना पडले आहेत. त्यातील सर्वात महत्वाचा अजून एक प्रश्न म्हणजे एलॉन मस्क (Elon Musk) यांनी हा निर्णय का घेतला?
खरंतर हा ‘डॉज’ डॉजकॉइन क्रिप्टोकरन्सीचा आयकॉन देखील आहे. एलॉन मस्क डॉजकॉइनच्या समर्थकांपैकी एक आहे. मीम्समध्ये हा ‘डॉज’ तुम्ही अनेकदा पाहिला असेल. मस्क यांनी फेब्रुवारीमध्येच लोगो बदलण्याचे संकेत दिले होते. त्यांनी ट्विटरवर बॉस म्हणून ‘डॉज’चा फोटो शेअर केला आणि नवा सीईओ उत्तम असल्याचे लिहिले होते. तेव्हापासूनच या संदर्भात अंदाज व्यक्त होत होते. आता ट्विटरवर आणखी मोठे बदल पाहायला मिळतील अशी अटकळही बांधली जात होती. आता हे प्रत्यक्षात आले असून ट्विटरचा नवा लोगो अस्तित्वात आला आहे.
जपानमधील सकुरा येथे राहतो डॉज काबोसू
ट्विटरचा लोगो बदलल्यानंतर डॉजकॉइनने ट्विट करून या कुत्र्याचे नाव काबोसू असल्याचे नमूद केले. तो जपानमधील साकुरा येथे मालक अत्सुको सातोसोबत राहतो. अत्सुको सातोने 2010 मध्ये तिच्या ब्लॉगवर काबोसूचे फोटो अपलोड केले होते. नंतर, बिटकॉइन सारख्या इतर क्रिप्टोकरन्सींवर मजा घेण्यासाठी त्याची चित्रे मीम्समध्ये वापरली गेली. काबोसू हा एक रेस्क्यू डॉग आहे, असे डॉजकॉइनने नमूद केले आहे.
The dog behind the #Doge meme and #Dogecoin cryptocurrency is named Kabosu and she still lives with her owner Atsuko Sato @kabosumama in Sakura, Japan. Kabosu was a rescue dog and became a meme after Atsuko uploaded photos of Kabosu, including the one below, on her blog in 2010. pic.twitter.com/x5Kliw2DVf
— Dogecoin (@dogecoin) April 3, 2023
एलॉन मस्क यांनी का घेतला हा निर्णय ?
या बदलाबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, परंतु मस्कचे एक ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी ट्विटर विकत घेण्यापूर्वी युजरला ट्विटर विकत घेण्याचे आणि लोगो बदलण्याचे आश्वासन दिले होते. या ट्विटवर मस्क यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे.
As promised pic.twitter.com/Jc1TnAqxAV
— Elon Musk (@elonmusk) April 3, 2023
इतकेच नव्हे तर मस्क यांनी ट्विटरवर एक मीमही शेअर केले होते. या मीममध्ये ‘डॉज’ कार चालवताना दिसत आहे आणि एक पोलिस अधिकारी त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सकडे पाहत आहे, पण ड्रायव्हिंग लायसन्सवर डॉजच्या फोटोऐवजी ‘ब्लू बर्ड’चा फोटो आहे.
— Elon Musk (@elonmusk) April 3, 2023
आज सकाळी जेव्हा लोकांनी अचानक ट्विटरचा लोगो बदललेला पाहिला, तेव्हा अनेकांना असं वाटलं की ट्विटर हॅक झाले आहे. पण नंतर एलॉन मस्क आणि डॉजकॉइन क्रिप्टोकरन्सीच्या ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्वीट्सने हे सिद्ध केले की आता ट्विटरचा लोगो कायमचा बदलला आहे.