मानवाला लावलं डुकराचं हृदय, आता कशी आहे रुग्णाची तब्येत ? हॉस्पिटलने दिली माहिती
लॉरेंस फॉसेट यांना हृदय रोगाचा त्रास होता. त्यांना मानवी हृदय बसविण्यात अडचणी होत्या. त्यामुळे युनिव्हर्सिटी ऑफ मॅरीलँड स्कूल ऑफ मेडीसिनच्या डॉक्टरांना प्रायोगिक सर्जरीचा सल्ला दिला.
न्यूयॉर्क | 21 ऑक्टोबर 2023 : अमेरिकेत एका महिन्यापूर्वी लॉरेंस फॉसेट नावाच्या व्यक्तीच्या शरीरात डुक्कराचे हृदय लावण्याची अवघड शस्रक्रिया पार पडली होती. आता ऑपरेशननंतर ही व्यक्ती पूर्णपणे बरी झाली आहे. मॅरीलॅंडची ही व्यक्ती जगातील दुसरी व्यक्ती आहे ज्यांच्यावर डुक्कराच्या हृदय ट्रान्सप्लांटची ( Pig Heart Transplant ) सर्जरी झाली आहे. या रुग्णालयाने शुक्रवारी एक व्हिडीओ जारी केला. त्यावरुन फॉसेट यांची तब्येत सुरळीत असून फॉसेट यांनी आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत पार पाडावेत यासाठी डॉक्टर मेहनत घेत असल्याचे दिसत आहे.
लॉरेंस फॉसेट यांना हृदय रोगाचा त्रास होता. त्यांना मानवी हृदय बसविण्यात अडचणी होत्या. त्यामुळे युनिव्हर्सिटी ऑफ मॅरीलँड स्कूल ऑफ मेडीसिनच्या डॉक्टरांना प्रायोगिक सर्जरीचा सल्ला दिला. हे ऑपरेशन 20 सप्टेंबर रोजी झाले. फॉसेट ( 58 ) यांनी जोरात श्वास घेत परंतू हसत म्हटले की हे थोडे कठीण वाटत आहे परंतू मी यातून बाहेर पडेन. मॅरीलँडच्या टीमने गेल्यावर्षी अनुवंशिक रुपाने परिवर्तित एका डुकराचे हृदय मानवाला लावण्याचे जगातील पहिले ऑपरेशन डेव्हीड बेनेट यांच्यावर केले होते. परंतू ऑपरेशननंतर दोन महिन्यांनी त्यांची तब्येत बिघडून अनेक कारणाने त्यांचा मृत्यू झाला.
फॉसेट स्वत:हून उभे रहात आहेत
बेनेट यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांनी झाला हे सुरुवातीला समजले नाही. नंतर त्यांच्या शरीराच डुकराचे व्हायरस गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दुसऱ्या घटनेआधी व्हायरसची नीट तपासणी करण्यात आली. मॅरीलॅंड टीमचे कार्डियक जेनोट्रान्सप्लांटेशन प्रमुख डॉ. मोहम्मद मोहिउद्दीन यांनी सांगितले की ( फॉसेट ) त्यांचे हृदय स्वत:हून काम करीत आहे. रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, फॉसेट स्वत:हून उभे रहाण्यास सक्षम आहेत. त्यांनी स्वत:हून चालता यावे यासाठी डॉक्टर प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.