अपघात की कट… ? हायटेक मोबाईलच्या काळात हिजबुल्लाहकडून पेजरचा वापर कशासाठी ?

हिजबुल्लाह सदस्यांकडे असलेले पेजर लिथियम बॅटरीने सुसज्ज होते. लिथियम बॅटरी ही तिच्या गरम होण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते. ती खूप गरम होते आणि त्यातून धूरही निघू शकतो. हीटिंगमुळे, लिथियम बॅटरी वितळू शकते आणि तिला आगही लागू शकते.

अपघात की कट... ? हायटेक मोबाईलच्या काळात हिजबुल्लाहकडून पेजरचा वापर कशासाठी ?
Follow us
| Updated on: Sep 18, 2024 | 8:15 AM

लेबनॉनमध्ये मंगळवारी अनेक पेजर्सचा एकाच वेळी स्फोट झाल्याने सर्वजण हैराण झालेत. खुद्द हिजबुल्लाह देखील या स्फोटामुळे चिंतित आहे. या स्फोटात हजारो जण जखमी झालेत. दुपारी 3.30 च्या सुमारास त्यांच्या संघटनतेली सदस्यांच्या पेजर्समध्ये अचानक रहस्यमयरित्या स्फोट होऊ लागले. हायटेक मोबाईलच्या, स्मार्टफोनच्या जमान्यात हिजबुल्लाहकडून पेजरचा वापर कशासाठी केला जातो ? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

सर्वात आधी पेजर बद्दल जाणून घेऊया. खरंतर पेजर हे एक लहान आणि पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. त्याच्या उद्देश शॉर्ट मेसेज किंवा अलर्ट/सूचना प्राप्त करणे आहे. एवढेच नव्हे तर मेसेज पाठवण्यासाठी देखील पेजरचा वापर केला जातो. हे उपकरण रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरून मेसेज मिळवतं आणि पेजरच्या स्क्रीनवर टेक्स्ट मेसेज आणि नंबर दिसतो.

अनेक पद्धतीचे असतात पेजर

पेजर हे अनेक पद्धतीचे असतात. उदा. न्यूमरिक पेजरमध्ये फक्त नंबर दिसतात आणि साध्या संवादासाठी वापरले जातात. तर अल्फान्यूमरक पेजर्स हे टेक्सट आणि नंबर दोन्ही दाखवतात, ज्यामुळे जास्त डिटेल मेसेज पाठवता येऊ शकतो. तसं पहायला गेलं तर आजच्या काळात खूप कमी लोक हे पेजरचा वापर करतात.

पण काही खास उद्योगांमध्ये आजही पेजरचा वापर केला जातो. विशेषत: आरोग्य सेवा आणि इमर्जन्सी सेवांमध्ये पेजरचा वापर केला जातो. एवढंच नव्हे तर गुप्त मेसेजस पाठवण्यासाठी देखील पेजरचा वापर केला जातो. लेबनॉनमधील पेजर स्फोटाच्या घटनेबाबत हिजबुल्लाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे स्फोट सुरक्षा ऑपरेशनचा परिणाम असू शकतात. यामागे इस्रायलचा हात असू शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे.

पेजरमध्ये होती लिथियम बॅटरी

हिजबुल्लाह सदस्यांकडे असलेले पेजर लिथियम बॅटरीने सुसज्ज होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. लिथियम बॅटरी ही तिच्या गरम होण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते. ती खूप गरम होते आणि त्यातून धूरही निघू शकतो. हीटिंगमुळे, लिथियम बॅटरी वितळू शकते आणि तिला आगही लागू शकते. लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहने, मोबाईल फोन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये या बॅटरी बसवल्या जातात.

अशा स्थितीत बॅटरी गरम झाल्यामुळे हा अपघात झाला असे मानायचे का? पेजरची बॅटरी जास्त गरम झाल्यामुळे हा स्फोट झाला. आणि असेल तर मग इतक्या लोकांचे पेजर अचानक कसे फुटले, सगळ्यांच्या बॅटरी एकाच वेळी गरम झाल्या? हा नक्की अपघात होता की गूढ कट कारस्थान होते, याबद्दल संशय व्यक्त होत आहे. हे गूढ कटकारस्थान आणि अपघातात अडकले आहे.

पेजरचा वापर का ?

लक्षात घेण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे, आजच्या हायटेक युगात नवनवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज मोबाईल फोन उपलब्ध आहेत, तर मग हिजबुल्लाचे सदस्य पेजर का वापरत होते? किंबहुना, इस्रायलच्या पाळत ठेवणाऱ्या लोकांपासून वाचण्यासाठी, हिजबुल्लाचे सदस्य पेजरसारख्या दळणवळण यंत्रणा वापरतात, जेणेकरून ते पाळत ठेवणाऱ्या लोकांपासून बचाव करू शकतील.

हिजबुल्लाहने विकत घेतले होते अल्फान्यूमरिक पेजर्स

लेबनानमधील हल्ल्याबद्दल बरीच माहिती समोर येत आहे, हिजबुल्लाहने अल्फान्यूमरिक पेजर्स खरेदी केले होते अशी माहिती समोर आली आहे. तैवानधील गोल्ड अपोल कंपनीने हे पेजर्स बनवले होते. रिपोर्टनुसार, या पेजर्समध्ये हा स्फोट झाला. या घटनेनंतर हिजबुल्लाने आपल्या सैनिकांना पेजरचा वापर बंद करण्याचा सल्ला दिला आहे. या स्फोटामागे इस्रायलचा हात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या स्फोटामागे सायबर हल्ल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.

इस्रायलकडून प्रतिक्रिया काय ?

मात्र इस्रायलने या स्फोटांबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा हिजबुल्लाहच्या आरोपांचे खडंनही केलेले नाही. त्यामुळे हा स्फोट कोणी घडवून आणला, यामागे इस्रायलचा हात आहे का आणि जर इस्रायलने हे कृत्य केले असेल, तर हिजबुल्लामध्ये भीती निर्माण करण्यासाठी पेजरची निवड का केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खायला-प्यायला नाही अन् फाटक्या साड्या; 'लाडक्या बहिणी' कुठं भडकल्या?
खायला-प्यायला नाही अन् फाटक्या साड्या; 'लाडक्या बहिणी' कुठं भडकल्या?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.