इराणचे राष्ट्रपती इब्राहीम रईसींप्रमाणे जगातील या बड्या नेत्यांचा विमान अपघातात शेवट
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचे रविवारी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर अनेक प्रश्न निमार्ण झाले आहेत. विमान अपघात आणि राजकीय नेतृत्वा यांचे सख्य नाही अशाच घटना इतिहासात घडल्या आहेत. विमान अपघातात आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांचे निधन झाले आहे. कोण आहेत ते पाहूयात...
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांची रविवारी 19 मे रोजी रात्री डोंगराळ भागात हेलिकॉप्टर दर्घटनेत मृत्यू झाला. इराणच्या राष्ट्रपती रईसी यांच्या सारखा जगातील काही महत्वाच्या नेत्यांचा विमानअपघातात मृत्यू झाला होता. तर पाहूयात जगातील कोणत्या नेत्यांचा हवाई प्रवासात मृत्यू झाला आहे. भारताने आपला मित्र असलेल्या इराणच्या राष्ट्रपती यांच्या आस्कमिक निधनाबद्दल सहवेदना व्यक्त करीत दुखवटा पाळल्याचा संदेश जारी केला आहे.
पाकिस्तानचे सहावे राष्ट्रपती जनरल मोहम्मद जिया उल हक यांचा 17 ऑगस्ट 1988 रोजी हवाईमार्गे प्रवास करताना निधन झाले होते. त्यांचे c – 130 हरक्युलिस विमान बहावलपुर येथून उड्डाण घेतले त्यानंतर लागलीच त्याच्या विमानाला अपघात होऊन मृत्यू झाला.
नेरु रामोस यांनी काही काळ ब्राझीलचे अंतरिम राष्ट्रपती म्हणून काम पाहीले होते, त्यांचे निधन 16 जून 1958 मध्ये झाले. रामोस क्रुजेईरो डो सुल एअरलाईनर मधून प्रवास करीत होते, तेव्हा त्यांचे विमान कुर्टिबा अफोंसो पेना आंतराराष्ट्रीय विमानतळाजवळ दुर्घटनाग्रस्त झाले.
फिलीपाईन्सचे सातवे राष्ट्रपती रेमन मॅग्सेसे यांचे विमान सी-47 हे 1957 सेबू शहरातील माऊंट मानुंगगल मध्ये दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यावेळी या विमानात 25 प्रवासी करीत होते.
स्वीडनचे दोनवेळा पंतप्रधान झालेले सॉलोमन अरविंद अचेट्स लिंडमॅन यांचा मृत्यू 9 डिसेंबर 1936 मध्ये एका विमान दुर्घटनेत झाला. ते डगलस डीसी-2 या विमानात बसले होते. दाट धुक्यामुळे उड्डाण घेताच इग्लंडच्या क्रॉयडन विमानतळावर घरांना थडकून त्यांचा मृत्यू झाला.
इराकचे दुसरे राष्ट्रपती अब्दुल सलाम आरिफ यांचा 13 एप्रिल 1966 रोजी मृत्यू झाला.त्याचे इराकी वायू सेनेचे विमान डी हॅव्हीलॅंड, 104 डोव, बसरा जवळ दुर्घटनाग्रस्त झाले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मुलगा संजय गांधी यांचे निधन देखील विमान अपघात झाला. 23 जून 1980 मध्ये त्यांच्या विमानाचे नियंत्रण दिल्ली जवळील सफदरजंग विमानतळाजवळ नष्ट झाल्याने ते कोसळले.
भारतीय राजकारणी आणि कॉंग्रेसचे नेते माधवराव शिंदे यांचा 30 सप्टेंबर 2001 रोजी विमानअपघातात मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जवळ त्यांच्या खाजगी बीच क्राफ्ट किंग एअर सी 90 ला हवेतच आग लागली.
ब्राझीलचे 26 वे राष्ट्रवादी आणि लष्करी हुकूमशहा हम्बर्टो डी अलेंकर कॅस्टेलो ब्रॅंको यांचा 18 जुलै 1967 मध्ये मृत्यू झाला. राष्ट्रपती पदावरुन पायउतार झाल्यानंतर काही काळानंतर कॅस्ट्रेलो ब्रॅंको यांचे पाईपर पीए-23 एज्टेक हवेतच ब्राझीलीयन वायू सेनेनेशी टक्कर होऊन त्याचा मृत्यू झाला.