ऑक्सफर्डकडून मलाला युसूफझाईचा गौरव; बापाचा आनंदानं म्हणाला…

झियाउद्दीन युसुफझाई पुढे म्हणाले की, मलाला या संधीचा उपयोग तिचे काम पुढे नेण्यासाठी करेल. यामुळे मुलींना शिक्षणादरम्यान येणाऱ्या आव्हानांवर उपाय शोधण्यातही मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ऑक्सफर्डकडून मलाला युसूफझाईचा गौरव; बापाचा आनंदानं म्हणाला...
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 11:39 PM

नवी दिल्ली : नोबेल शांतता पुरस्कार विजेती आणि स्त्री शिक्षण कार्यकर्ती म्हणून ओळखली जाणारी मलाला युसुफझाईने आपल्या नावावर आता एक नवा विक्रम केला आहे. मलाला युसुफझाईला ऑक्सफर्डकडून मानद फेलोशिप मिळाली आहे. ऑक्सफर्डकडून होणारा तिचा हा गौरवामुळे मलाला पाकिस्तानची पहिली नागरिक ठरली आहे. ही मानद फेलोशिप लिनक्रे कॉलेज, ऑक्सफर्ड द्वारे दिली जाते. मलाला ही नोबेल पारितोषिक मिळवणारी सर्वात तरुण महिला आहे.

ऑक्सफर्ड पाकिस्तान प्रोग्राम (ओपीपी) कडून सांगण्यात आले आहे की, मलाला व्यतिरिक्त नोबेल पुरस्कार विजेते सर पॉल नर्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या संसदेच्या नॅशनल असेंब्लीचे पहिले स्पीकर डॉ. फ्रॅन गिनवाला यांनाही ही मानद फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे.

तर ऑक्सफर्ड विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमामध्ये फेलोशिप मिळालेल्या गौरवमूर्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर कार्यक्रमामध्ये आपले मनोगत व्यक्त करताना मलालाने लिनक्रे कॉलेजमध्ये तिला भेटलेल्या तिच्या मैत्रिणींच्याही आठवणी तिने सांगितल्या. मलालाकडून या कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक करण्यात आले तर आता पाकिस्तानमधील विद्यार्थ्यांचे जीवन आता शिक्षणामुळे बदलत असल्याचेही तिने इथे नमूद केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.निक ब्राउन यांनी मलालाच्या स्त्री शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि आज मलालाची संपूर्ण जगात स्त्री शिक्षणासाठी काम करण्याची वेगळी ओळख असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी जेव्हा मुलीला हा सन्मान मिळाला तेव्हा वडील झियाउद्दीन युसुफझाई यांच्या आनंदालाही पारावार उरला नाही.

याबाबत त्यांनी सांगितले की, माझ्या मुलीला हा सन्मान मिळाला आहे, जो माझ्यासाठीही एखाद्या सन्मानापेक्षा काही कमी नाही. जेव्हा तिला सन्मान मिळत होता तेव्हा मलालाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मलालाचा आज मला अभिमान वाटत असून तिच्यामुळे मला प्रचंड आनंद झाला आहे असंही मतही त्यांनी यावेळ व्य्कत केले.

झियाउद्दीन युसुफझाई पुढे म्हणाले की, मलाला या संधीचा उपयोग तिचे काम पुढे नेण्यासाठी करेल. यामुळे मुलींना शिक्षणादरम्यान येणाऱ्या आव्हानांवर उपाय शोधण्यातही मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.