मालदीवला मोठं आर्थिक संकट भेडसावणार?; त्या निर्णयामुळे भारतीय पर्यटक मालदीवला करणार बाय-बाय ?
मालदीव सरकार 1 डिसेंबर पासून एक्झिट टॅक्स वाढवणार असून त्यामुळे भारतीय पर्यटकांना झटका लागू शकतो. इकॉनॉनी पासून ते प्रायव्हेट जेटपर्यंत सर्व क्लासच्या प्रवाशांना हा टॅक्स लागू होणार आहे. मालदीवमधील वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या देखभालीसाठी हा कर लावण्यात येणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून विविध मुद्यांमुळे चर्चेत असलेला मालदीव हा देश अतिशय महागडा आहे. मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक मालदीवला फिरायला जात असतात. पण आता तेथील सरकारच्या एका निर्णयामुळे मालदीवला फिरायला जाण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागणार आहे. खरंतर मालदीव सरकार आता एग्झिट फी वाढवणार आहे. येत्या 1 डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे समजते.
किती लागणार टॅक्स ?
एका रिपोर्टनुसार, मालदीवमधून बाहेर पडणाऱ्या लोकांना फ्लाइटमध्ये क्लासनुसार जास्त पैसे भरावे लागणार आहेत. म्हणजेच इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तील 50 डॉलर भरावे लागणार आहेत, आधी हेच दल 30 डॉलर इतके होते. तर बिझनेस क्लासमधून प्रवास करणाऱ्यांना 120 डॉलर भरावे लागीतल, यापूर्वी त्यांना 60 डॉलर भरावे लागायचे. एवढेच नव्हे तर फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला 240 डॉलर्स भरावे लागतील, आधी हा दर 90 डॉलर्स इतका होता. प्रायव्हेट जेटमधून प्रस्थान करणाऱ्यांना तब्बल 480 डॉलर्स भरावे लागतील, आधी ही किंमत 120 डॉलर्स होती.
विशेष म्हणजे हा टॅक्स मालदीवमधील नव्हे तर बाहेरील लोकांवर लागणार आहे. त्यांचे वय किती किंवा ते किती लांबून आले आहेत, याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. म्हणजेड लंडन वरून मालदीवला आलेल्या लोकांनाही तितकाच कर भरावा लागेल जितका दिल्लीहून तेथे गेलेल्या लोकांना भरावा लागणार आहे. मालदीव इनलँड रेव्हेन्यू अथॉरिटीने नोव्हेंबरमध्ये देशाच्या वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या देखभालीसाठी महसूल निर्माण करण्यासाठी कर वाढीची घोषणा केली.
मेख अशी आहे की काही पर्यटकांना या नव्या फीबद्दल काही माहीतीच नसेल. हे शुल्क एअरलाइन तिकीटांच्या किमतीतच जोडलं जातं. याव्यतिरिक्त, मालदीवच्या दिशेने उड्डाण करणाऱ्या स्टार्टअप ऑल-बिझनेस-क्लास एअरलाइनने नवीन कर टाळण्यासाठी ग्राहकांना 30 नोव्हेंबरपूर्वी तिकिटे खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
भारतीयांच्या रागाचा मालदीवला बसला होता फटका
यावर्षाच्या सुरूवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लक्षद्वीपच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी तेथील काही फोटो शेअर केले होते. तसेच देशातील नागरिकांनी लक्षद्वीप फिरण्यासाठी आवर्जून जावे असे आवाहनही पंतप्रधानांनी केलं होतं. मात्र मोदी यांचे हे आवाहन मालदीवला फारसं रुचलं नाही आणि अनेक नेत्यांनी वादग्रस्त विधान केली.
मालदीवच्या नेत्यांच्या वक्तव्यानंतर भारतीयांनी त्यावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. दोन्ही देशांमधील संबंधही बिघडले होते. भारतीयांनी बहिष्कार टाकल्याने मालदीवला मोठा धक्का बसला. या काळात मालदीवमध्ये जाणाऱ्या भारतीयांची संख्या कमी झाली आणि लक्षद्वीपला जाणाऱ्यांची संख्या वाढतच गेली.
त्यानतंर थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया हे मालदीवसाठी संभाव्य पर्याय म्हणून समोर आले. या देशांमधील समुद्रकिनारे आणि अतिरिक्त प्रवासाचे पर्याय यामुळे मालदीववर दबाव वाढत होता. भारताशी शत्रुत्व महागात पडेल आणि नुकसानच होईल हे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना लक्षात आल्याने त्यांनी त्यांची भूमिका बदलत मैत्रीसाठी हात पुढे केला.
मालदीवमध्ये अंदाजे 1,200 कोरल आयलंड आणि प्रवाळांचा समावेश आहे. तेथील लोकसंख्या सुमारे 5,20,000 आहे. बहुतांश गोष्टींसाठी मालदीव हा भारतावर अवलंबून आहे.