ऐsss शाबास! 9 बायकांशी लग्न, नऊही जणींना शारीरिक सुखी ‘समाधानी’ ठेवण्यासाठी नवऱ्याचा खत्रूड प्लॅन

लग्न लागलं. संसार सुरु झाला. आता प्रश्न निर्माण झाला, तो कोणत्या बायकोला किती वेळ द्यायचा, याचा!

ऐsss शाबास! 9 बायकांशी लग्न, नऊही जणींना शारीरिक सुखी 'समाधानी' ठेवण्यासाठी नवऱ्याचा खत्रूड प्लॅन
9 बायका आणि फजितीच्या पलिकडची गोष्ट ऐका...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 10:44 PM

मुंबई : एक बायको (wife) सांभळताना अवघड, याने तर एकापेक्षा जास्त केल्यात. दोन, तीन नव्हे तर चक्क नऊ बायका केलेल्या एका नवऱ्याची गोष्ट खास असणार, हे वेगळं सांगण्याची गरज आहे का? कारण एकाच वेळी नऊ जणींना त्याला खूशही ठेवायचं आणि खऱ्या अर्थानं शारीरीक सुखाच्या बाबतीत समाधानीदेखील ठेवयायं, हे ‘खायचं’ काम नाही! आता हे शारीरीक सुख (Physical satisfaction) देण्यासाठी आपल्या नऊ बायकांना कसं मॅनेज करायचं, हा प्रश्न या तरुणाला पडणं स्वाभाविकच होतं. तसा तो पडलाही. त्यासाठी त्यानं जे केलं, ते खतरनाकच आहे. एका वेळी नऊ मुलींसोबत संसार करणारा हा तरुण मूळचा ब्राझिलचा. त्याचं नाव आर्थर. पूर्ण नाव आर्थर ओउर्सो (Arthur O Urso). आर्थरनं एकाच वेळी नऊ मुलींशी लग्न केलं. आयुष्यात एकीशीच काय लग्न करायचं, या कॉन्सेप्टला छेड देत त्याने नऊ जणांनी संसार करण्याचं ठरवलं. नऊ जणींशी लग्न केलंही. पण नऊ जणींना सांभाळणं किती कठीण, हे एकीला सांभाळणाराही समजू शकतो. त्यामुळे मग या नऊ जणींना सांभण्यासाठी, त्यांचे मूड जपण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना शारीरिक सूखी आणि समाधानी देण्यासाठी ब्राझीलच्या या पठ्ठ्यानं जालीम उपाय शोधून काढला.

काय होता उपाय?

ब्राझीलने शोधून काढलेला उपाय होता आलटून पालटून वेगवेगळ्या बायकांना वेळ देण्याचा. त्यासाठी खास वेळापत्रकही त्यानं बनवलं. त्यानं बनवलेल्या या वेळा पत्रकाला शुद्ध भाषेत सेक्स रोस्टर असं म्हणतात. एएनआयनं याबाबतची माहिती दिली आहे. प्रेम करण्याचं स्वातंत्र आणि फक्त एकदाच काय लग्न करायचं, या दोन्ही गोष्टी फॉलो करत ब्राझीलच्या आर्थरनं नऊ वेळा लग्न केलं. सगळ्यात आधी त्यानं एकीशीच लग्न केलं होतं. त्यानंतर त्यानं आठ जणींशी विवाह केला. महत्त्वाचं म्हणजे आठही जणी त्याच्याशी लग्न करायला तयारही झाल्या.

View this post on Instagram

A post shared by Arthur O Urso (@arthurourso)

अरे संसार संसार

लग्न लागलं. संसार सुरु झाला. आता प्रश्न निर्माण झाला, तो कोणत्या बायकोला किती वेळ द्यायचा, याचा! शिवाय प्रत्येक बायकोला मानसिक सुख तर द्यायचं आहेच. पण शारीरिक सुखही तितकंच गरजेचं आहे. कुणालाही निराश करुन चालणार नाही, हे आर्थर जाणून होता. म्हणूनच मग त्यानं एक खास वेळापत्रक बनवलं. आता हे वेळापत्रक फॉलो करणं किती खतरनाक असेल, तरं तुम्हाला वाटू शकतं. पण खतरनाक असण्यापेक्षाही आर्थरसाठी ते प्रचंड थकवणारं होतं.

View this post on Instagram

A post shared by Arthur O Urso (@arthurourso)

एकीला शरीर सुख देताना डोक्यात दुसरीचेच विचार यायचे, असं आर्थननं सांगितलंय. हा प्रकार त्यांच्यासाठी प्रचंड थकवणारा असा होता, असं त्याने म्हटलंय. सातत्यानं शरीर सुख देण्याचे प्रकार सुरु असल्यानं त्यातला आनंद दूर जाऊन फक्त समाधानासाठी आपण ती गोष्ट करतोय, अशी भावनाही निर्माण होत असल्याची शंका आर्थरच्या मनात येऊ लागली होती. शेवटी त्यानं हे वेळापत्रक फॉलो करणं वैतागून सोडूनच दिलं.

View this post on Instagram

A post shared by Arthur O Urso (@arthurourso)

बायका.. त्या बायकाच!

यापुढे आर्थरनं सांगितलेला किस्सा त्याहून भारी आहे. नऊ बायका होत्या. शरीर सुखासाठी वेळापत्रक तयार होतं. त्यामुळे कोणत्याच बायकोला याबद्दल काहीच आक्षेप नव्हता. पण जेव्हा आर्थर आपल्या बायकांना महागड्या भेटवस्तू देऊ लागलं. त्यानंतर मात्र बायका कमालीच्या रागवायच्या. रुसाच्या. हिरमुसून जायच्या. म्हणजे शरीरापेक्षाही भेटवस्तूंवरुन भांडणं होण्याचे प्रकार या बायकांसाठी महत्त्वाची होती, असंच आर्थरच्या सांगण्यावरुन दिसतंय. आता या नऊ बायकांमधील त्याची एक बायको त्याच्यापासून वेगळ्या होण्याच्या विचारात आहे. तशी मागणीही तिनं केली आहे. आता प्रेम करण्याचं स्वातंत्र देण्याच्या कॉन्सेप्टवर इतक्या जणींशी लग्न केलेला आर्थर आपल्या त्या बायकोला जगण्याचं स्वातंत्र देणार का, याचीही बातमी एएनआय देणार का, यावर आम्हीची बारीक नजर असणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून…

View this post on Instagram

A post shared by Arthur O Urso (@arthurourso)

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.