गर्लफ्रेण्डला अंडरवॉटर प्रपोज करण्याचा प्रयत्न, तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू

केनेशा एका पाणबुडीतून समुद्राखाली गेली, तर स्टीव्हने समुद्रात उडी मारुन तिच्या पाणबुडीच्या काचेवर लग्नाची मागणी घालणारा कागद धरला. मात्र त्यानंतर पाणबुडीसमोरुन तो निघून गेला, तो कधी परतलाच नाही

गर्लफ्रेण्डला अंडरवॉटर प्रपोज करण्याचा प्रयत्न, तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू
Follow us
| Updated on: Sep 23, 2019 | 12:49 PM

डोडोमा, टांझानिया : गर्लफ्रेण्डला अंडरवॉटर प्रपोज करण्याचा प्लॅन अमेरिकन तरुणाच्या चांगलाच अंगलट आला. प्रेयसीला आफ्रिकेत समुद्राच्या पाण्याखाली प्रपोज करण्याच्या नादात तरुणाचा बुडून मृत्यू (Man drowns while proposing girlfriend underwater) झाला.

मूळ अमेरिकेतील ल्युइजियाना प्रांताचा रहिवासी असलेला स्टीव्ह वेबर गर्लफ्रेण्ड केनेशा अँटोनेसबोत आफ्रिकेतील टांझानियाला गेला होता. प्रेयसीला लग्नाचा प्रस्ताव देण्याचं त्याने आधीपासूनच ठरवलं होतं. मात्र काहीतरी हटके करण्याचं त्याच्या डोक्यात शिजत होतं.

आतापर्यंत हवेत, पाण्याखाली प्रपोजच नाही, तर लग्न करण्याचे पराक्रमही अनेक जोडप्यांनी गाजवले आहेत. असाच काहीसा प्लॅन स्टीव्हच्या डोक्यात आला आणि त्याने गर्लफ्रेण्डला पाण्याखाली प्रपोज करण्याचा निर्णय घेतला.

केनेशा एका पाणबुडीतून समुद्राखाली गेली, तर स्टीव्हने समुद्रात उडी मारुन तिच्या पाणबुडीच्या काचेवर एक कागद धरला. ‘तुझ्याबद्दल मला काय काय आवडतं, हे सांगण्याइतका काळ मी श्वास रोखून धरु शकत नाही. मात्र माझं तुझ्यावर नितांत प्रेम आहे.’ अशा आशयाचं प्रपोजल त्याने केलं. त्यानंतर अंगठी दाखवून तो पाणबुडीसमोरुन निघून गेला.

करुणाजनक बाब म्हणजे तिथून गेलेला स्टीव्ह परत किनाऱ्यावर कधीच परत येऊ शकला नाही. कारण समुद्राच्या पाण्यात बुडून स्टीव्हचा मृत्यू (Man drowns while proposing girlfriend underwater) झाला होता. केनेशाने एका फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. ‘आमच्या आयुष्यातला सर्वोत्तम दिवस सर्वात वाईट दिवस ठरला. नियतीचा दुर्दैवी आघात’ असं केनेशाने म्हटलं आहे.

लग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

‘तू तिथून परत आला नाहीस, म्हणून तू माझं उत्तर कधीच ऐकू शकणार नाही. हो… हो… लक्ष-लक्ष वेळा सांगते.. माझा होकार आहे, हो, मी तुझ्याशी लग्न करणार’ असं लिहितानाही तिच्या अश्रूंचा बांध फुटला असावा.

केनेशाच्या पोस्टवर अनेक जणांनी तिचं सांत्वन करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. देव तुला या कठीण काळात लढण्याचं बळ देओ, इथपासून स्टीव्ह कायम आपल्या स्मरणात राहील, असं लिहित अनेक फेसबुक यूझर्सनी तिच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे स्टीव्ह आणि केनेशा यांना न ओळखणाऱ्या अनेक जणांनीही त्यांची करुण प्रेमकहाणी वाचून हळहळ व्यक्त केली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.