समुद्रात हरवलेल्या बोटीवर केचअप खाऊन त्याने 24 दिवस काढले
हॉलीवूडच्या 'कास्ट अवे' चित्रपटाचा सीन कॅरेबियन बेटांवर घडला आहे. एका कॅरेबियन समुद्रात भरकटलेल्या सेल बोटीवर एकाच अडकलेल्या एका 47 वर्षीय नागरीकाची कोलंबियन नेव्हीने सुटका केली आहे. कसे काढले त्याने निर्जन बेटावर 28 दिवस वाचा
नेदरलँड : तुम्ही हॉलीवूडचा ‘कास्ट अवे’ (CAST AWAY ) चित्रपटात एका निर्जन बेटावर चित्रपटाच्या नायकाचे विमान कोसळून तो एकटाच त्या अपघातात वाचतो. अशीच कथा प्रत्यक्षात घडली आहे. यात कोलंबियन नेव्हीने एका समुद्रात भरकटलेल्या बोटीतून 47 वर्षीय नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे. हा नागरिक केवळ टोमॅटो केचअप खाऊन 24 दिवस कसेबसे जगला अखेर कोलंबियन समुद्रातून नेव्हीच्या जवानांनी त्याची सुखरूप सुटका केली.
माझ्याकडे काही अन्न नव्हते. त्या बोटीवर केवळ केचअपची एक बाटली होती. गार्लिक पावडर आणि बॉलीयन क्युब्स मॅगी होती. त्यांना पाण्यात मिक्स करून ते खाऊन आपण जगल्याचे एल्वीस फ्रँकॉईस (47 ) कोलंबियन नेव्हीने जारी केलेल्या एका व्हीडीओत म्हटले आहे. त्याने इंग्रजीत मोठ्या अक्षरात त्याच्या बोटीवर HELP असे लिहीले होते. प्युरीटो बोलीवर पासून 120 समुद्री मैल अंतरावरून ला घावजीराच्या नॉर्दन डिपार्टमेंटने त्याची नेव्हीने सुटका केली. त्याने एक नौका जाताना पाहीली तिला सिग्नल देण्यासाठी त्याने झेंडा झळकला आणि आगही लावून पाहीली परंतू त्या नौकेतील कोणाचे लक्ष गेले नाही, किंवा त्यांना काही कळले नाही. अखेर आरशाने त्याने सूर्यप्रकाश परावर्तित करून एका विमानाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वी झाला.
अखेर 15 जानेवारीला त्याने एक विमान पाहीले. त्याच्याकडे एक आरसा होता. त्याद्वारे त्याने सूर्यप्रकाश परावर्तित करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्या एअरक्राफ्टच्या क्रूने अखेर पाहीले आणि नेव्हीला कळविले. चोवीस दिवस जमीन पाहीली नाही, कोणी बोलायला नाही, दुरदूरपर्यंत कोणी दिसत नव्हते. काय करावे सुचत नव्हते. आपण नेमके कुठे आहोत हेच कळत नव्हते, मनात वाईट विचार येत होते. पण आपण बोट बुडू दिली नाही. या काळात कुटुंबियांची आठवण येत होती असे त्याने सांगितले. एल्वीस याचा कॅरीबियन बेटावर सेल बोट दुरूस्तीचा व्यवसाय आहे. नेदरलँडच्या सेंट मा्र्टीनमधून गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये खराब हवामानाने त्याची बोट समुद्रात भरकटली होती.