Hamas Israel War | हमासची आता खैर नाही, इस्रायलच्या मदतीला यूके, अमेरिकेसह हे देश उतरले

इस्राईलवर हमास या अतिरेकी गटाने केलेल्या हल्ल्यानंतर व्हाईट हाऊसने संयुक्त निवदेन जारी केले आहे. हमासच्या विरोधात इस्राईलच्या समर्थनासाठी अमेरिकेसह पाच देश समोर आले आहेत.

Hamas Israel War | हमासची आता खैर नाही, इस्रायलच्या मदतीला यूके, अमेरिकेसह हे देश उतरले
Rishi-Sunak-Joe-BidenImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 1:04 PM

तेल अवीव | 10 ऑक्टोबर 2023 : बेसावध असलेल्या इस्राईलवर हमास या अतिरेकी संघटनेने केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील पलटवार केला आहे. तीन दिवस सुरु असलेल्या या घनघोर युद्धा दरम्यान गाझा आणि वेस्ट बॅंक येथे 700 हून अधिक लोक ठार झाले आहेत. तर इस्राईलमध्ये 1100 हून अधिक नागरिक ठार झाले आहेत. या युद्धाची सुरुवात हमासने केली असली तर शेवट आपणच करु असे खुले आव्हान इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केले आहे. दरम्यान,  इस्राईलच्या बाजूने अनेक देश उतरले आहेत.

हमास आणि इस्राईल युद्धात आता इस्राईलच्या बाजूने अनेक देश उतरले आहेत. या देशात अमेरिका, युनायटेड किंगडम, इटली, जर्मनी आणि फ्रान्स यांचा समावेश आहे. व्हाईटहाऊसने यासंदर्भात लेखी निवेदन जारी केले असून हमाससारख्या अतिरेकी संघटनांना सहन केले जाऊ शकत नाही. त्यांचा खात्मा करणे आवश्यक असल्याचे या संयुक्त निवेदनात अमेरिकेने म्हटले आहे.

इस्राईलवर हमास या अतिरेकी गटाने केलेल्या हल्ल्यानंतर व्हाईट हाऊसने संयुक्त निवदेन जारी केले आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रों, जर्मनीचे चांन्सलर शोल्ज, इटलीचे पंतप्रधान मोलोनी आणि युकेचे पंतप्रधान ऋृषी सुनक आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी हमासच्या हल्ल्याचा कठोर शब्दात निंदा केली आहे. आणि इस्राईलसोबत उभे रहाण्याचा निर्णय घेतला आहे. हमासला केलेल्या काहीही संयुक्तिक कारण नाही हे आम्ही स्पष्ट करीत आहोत असे या देशांनी म्हटले आहे. या घटनेचा जागतिक पातळीवर निषेध व्हायला हवा. आम्ही पाहिलेय हमासच्या अतिरेक्यांनी कसे खुलेआम नरसंहार केला आहे, त्यांनी म्युझिक फेस्टीव्हलमध्ये 200 अधिक युवकांना ठार केले आहे.अनेक लोक अजूनही ओलीस आहेत असे या राष्ट्रांनी म्हटले आहे.

इतर देशही सोबत येतील

आम्ही इस्राईलच्या आत्मसंरक्षणासाठी त्यांना मदत करु. काही असेही देश आहेत जे या हल्ल्याचे समर्थन करीत आहेत. आम्ही पॅलेस्टाईन आणि इस्राईल या दोन्ही देशांना समान स्थान देत आहोत. कोणीही चूका करता कामा नयेत. हमास पॅलेस्टाईनसाठी दहशतवाद पसरविण्याशिवाय काहीही करीत नाही. ते केवळ हिंसाचार करीत आहेत. मध्य आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी येत्या दिवसात सर्व देश इस्राईल सोबत येतील असेही त्यांनी म्हटले आहे. हमासच्या हल्ल्यात अमेरिकेचे किमान चार नागरिक ठार झाले आहे. तर हमासच्या हल्ल्यानंतर इराण, सौदी अरब आणि लेबनान या देशात आनंद साजरा केला गेला. या हल्ल्याचा कट हमास सोबत इराण आणि लेबनान यांनी रचला होता. यावेळी इस्रायलची ताकदवान गुप्तचर संघटना ‘मोसाद’ देखील हा कट वेळीच ओळखण्यात अपयशी ठरली आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.