वादळाला त्सुनामी समजून डोंगरावर जात होते, पाणी आलं आणि सगळ्यानाच घेऊन गेलं…,अजूनही मृत्यूदेह काढणं सुरुच…

फिलिपाइन्सच्या कुसिओंग गावामध्ये वादळामुळे झालेल्या दुर्घटनेत 51 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे, तर 100 पेक्षा जास्त लोकं बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

वादळाला त्सुनामी समजून डोंगरावर जात होते, पाणी आलं आणि सगळ्यानाच घेऊन गेलं...,अजूनही मृत्यूदेह काढणं सुरुच...
Follow us
| Updated on: Oct 30, 2022 | 4:34 PM

नवी दिल्लीः फिलिपाइन्सच्या कुसिओंग गावामध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. गावात आलेल्या वादळाला येथील रहिवाशांनी त्सुनामी समजले होते. त्या वादळापासून वाचण्यासाठी म्हणून ते एका उंच ठिकाणी असणाऱ्या डोंगराच्या दिशेने धावत गेले , त्या डोंगराजवळ अस सगळ्यांचाच अपघाती मृत्यू झाला. पाऊस आणि वादळामुळे आलेल्या पुरात बुडून 51 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

वायव्य किनारपट्टीला या जोरदार वादळाचा फटका बसला आहे. मॅग्विंदानाओच्या दक्षिणेकडील प्रांतातील कुसेओंग गावातून बचाव पथकाने आतापर्यंत किमान 18 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे कुसेओंग गावात वादळ आणि पावसाचा फटका बसला होता. त्यावेळी त्यावेळी त्या वादळाला त्सुनामी समजून लोक उंच डोंगरावर पळत जात असताना तलावाच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे 80 ते 100 लोक पुराच्या पाण्यात बुडाल्याची आणि वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. अजून हा आकडा निश्चित सांगता येणार नाही असं तेथील प्रशासाने सांगितले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून फिलीपिन्समध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे किमान 50 लोकांचा मृत्यू झाला असून 80 पेक्षा जास्त लोकं वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आपत्तीच्या दृष्टीने सर्वात असुरक्षित असलेल्या देशांपैकी एक असलेल्या फिलिपाइन्समध्ये या वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.

कुसेओंग गावासाठी ही मोठी आपत्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. तेदुरे वांशिक अल्पसंख्याकांचे हे दाट लोकवस्तीचे गाव आहे. याच गावातील 2,000 हून अधिक नागरिक त्सुनामीपासून वाचण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून दरवर्षी आपत्ती व्यवस्थापनाचे या ठिकाणी धडे दिले जात होते.

कुसेओंगच्या नागरिकांना धोक्याची सूचना मिळाल्यानंतर ते धावू लागले आणि एका उंचावरील कॅथेड्रलमध्ये जमा झाले. मात्र त्या डोंगरावर जात असताना वादळ आणि पावसामुळे पाण्याची पातळी वाढून त्यामध्ये लोकांचा जीव गेला आहे.

कुसेओंगमध्ये ऑगस्ट 1976 मध्ये मोरो बे या परिसराच्या आसपास 8.1 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले होते, त्यावेळी तेथे आलेल्या त्सुनामीने मोठ्या प्रमाणावर विनाश घडवून आणला होता, आणि त्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.