नवी दिल्लीः फिलिपाइन्सच्या कुसिओंग गावामध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. गावात आलेल्या वादळाला येथील रहिवाशांनी त्सुनामी समजले होते. त्या वादळापासून वाचण्यासाठी म्हणून ते एका उंच ठिकाणी असणाऱ्या डोंगराच्या दिशेने धावत गेले , त्या डोंगराजवळ अस सगळ्यांचाच अपघाती मृत्यू झाला. पाऊस आणि वादळामुळे आलेल्या पुरात बुडून 51 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.
वायव्य किनारपट्टीला या जोरदार वादळाचा फटका बसला आहे. मॅग्विंदानाओच्या दक्षिणेकडील प्रांतातील कुसेओंग गावातून बचाव पथकाने आतापर्यंत किमान 18 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे कुसेओंग गावात वादळ आणि पावसाचा फटका बसला होता. त्यावेळी त्यावेळी त्या वादळाला त्सुनामी समजून लोक उंच डोंगरावर पळत जात असताना तलावाच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे 80 ते 100 लोक पुराच्या पाण्यात बुडाल्याची आणि वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. अजून हा आकडा निश्चित सांगता येणार नाही असं तेथील प्रशासाने सांगितले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून फिलीपिन्समध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे किमान 50 लोकांचा मृत्यू झाला असून 80 पेक्षा जास्त लोकं वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आपत्तीच्या दृष्टीने सर्वात असुरक्षित असलेल्या देशांपैकी एक असलेल्या फिलिपाइन्समध्ये या वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
कुसेओंग गावासाठी ही मोठी आपत्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. तेदुरे वांशिक अल्पसंख्याकांचे हे दाट लोकवस्तीचे गाव आहे. याच गावातील 2,000 हून अधिक नागरिक त्सुनामीपासून वाचण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून दरवर्षी आपत्ती व्यवस्थापनाचे या ठिकाणी धडे दिले जात होते.
कुसेओंगच्या नागरिकांना धोक्याची सूचना मिळाल्यानंतर ते धावू लागले आणि एका उंचावरील कॅथेड्रलमध्ये जमा झाले. मात्र त्या डोंगरावर जात असताना वादळ आणि पावसामुळे पाण्याची पातळी वाढून त्यामध्ये लोकांचा जीव गेला आहे.
कुसेओंगमध्ये ऑगस्ट 1976 मध्ये मोरो बे या परिसराच्या आसपास 8.1 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले होते, त्यावेळी तेथे आलेल्या त्सुनामीने मोठ्या प्रमाणावर विनाश घडवून आणला होता, आणि त्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता.