पाकिस्तान: पंजाब संसदेत प्रचंड गदारोळ, नेत्यांनी उपसभापतींना मारल्याचा आरोप

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये (Pakistan) काही केल्या राजकीय नाट्यावर पडदा पडताना दिसत नाही. येथे रोज कोणत्या कोणत्या नव्या नाट्याला सुरूवात होते. ज्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान (Former Prime Minister Imran Khan) यांचे नाव समोर येतं. आधी आपल्या पदाचा राजीनामा देताना घातलेला गोंधळ. त्यानंतर देशातील जनतेला तयार रहा असं म्हणणं. यानंतर आपल्या पदाचा गैरवापर करत परस्पर […]

पाकिस्तान: पंजाब संसदेत प्रचंड गदारोळ, नेत्यांनी उपसभापतींना मारल्याचा आरोप
पंजाब संसदेत प्रचंड गदारोळImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 3:30 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये (Pakistan) काही केल्या राजकीय नाट्यावर पडदा पडताना दिसत नाही. येथे रोज कोणत्या कोणत्या नव्या नाट्याला सुरूवात होते. ज्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान (Former Prime Minister Imran Khan) यांचे नाव समोर येतं. आधी आपल्या पदाचा राजीनामा देताना घातलेला गोंधळ. त्यानंतर देशातील जनतेला तयार रहा असं म्हणणं. यानंतर आपल्या पदाचा गैरवापर करत परस्पर नेकलस विकण्याचे प्रकरण आणि त्यानंतर त्यांच्या माजी पत्नीनेच त्यांची उडविलेली खिल्ली यामुळे माजी पंतप्रधान खान सध्या चांगलेच चर्चेत आहेत. इतकेच काय तर माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अडचणी वाढ होताना दिसत आहेत. आता तर नेकलस (Necklace) प्रकरणावरून त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये शनिवारी मोठा गदारोळ झाला. तर पीटीआयच्या खासदारांनी (MP) नॅशनल असेंब्लीमध्ये शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयच्या खासदारांनी पंजाब नॅशनल असेंब्लीमध्ये उपसभापतींवरही हल्ला केल्याचा आरोप होत आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या नॅशनल असेंब्लीमध्ये मारामारी झाली आहे. तसेत इम्रान खान यांच्या पीटीआय आणि पाकिस्तानचे नवे पंतप्रधान मुस्लिम लीगचे अध्यक्ष शाहनाज शरिफ यांच्या खासदार एकमेकांना भिडले. दोन्ही पक्षांच्या खासदारांमध्ये हाणामारी झाली आहे. इम्रान खान सत्तेबाहेर आहेत. त्यांच्या जागी पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनले आहेत. इम्रान खान यांच्या जाण्याने त्यांच्या पक्ष पीटीआयचे नेते आणि कार्यकर्ते नाराज आहेत. याचाच प्रत्यय आज पंजाब नॅशनल असेंब्लीमध्ये पाहायला मिळाला.

लाहोर उच्च न्यायालयाने आदेश

लाहोर हायकोर्टाने शुक्रवारी पंजाब विधानसभेला राज्यातील दुसऱ्या सर्वात मोठ्या प्रांताच्या नवीन मुख्यमंत्र्याच्या निवडीसाठी १६ एप्रिलपूर्वी निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. उस्मान बाजदार यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे जवळचे सहकारी उस्मान बजदार यांनी 1 एप्रिल रोजी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पंजाब विधानसभेने सभागृहाचा नवीन नेता निवडण्यासाठी अधिवेशन बोलावले होते. तेव्हा सत्ताधारी पीटीआयच्या आमदारांनी उपसभापतींविरुद्ध अविश्वास ठराव मांडला. हा प्रस्ताव मांडल्यानंतर पंजाब विधानसभेला सरकारने सील ठोकले आणि तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

मतदान ६ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले

यापूर्वी, नवीन मुख्यमंत्र्यांसाठी 3 एप्रिल रोजी मतदान होणार होते. परंतु विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभेच्या सभागृहाची तोडफोड केल्याचा आरोप केल्यानंतर ते 6 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले. मात्र, नंतर ती 16 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.