CCTV VIDEO: आई गं ! ती 400 पाऊण्ड वजन उचलायला गेली आणि त्याच्याखालीच चिरडली, थरकाप उडवणारा व्हिडीओ

| Updated on: Feb 24, 2022 | 11:27 AM

397 पाऊण्डची बारबेल तिच्या मानेच्या मागील बाजूला पडल्यानंतर जिममधील इतरांनी लगेच तिला मदत करण्यासाठी धाव घेतली, मात्र ती जमिनीवर निपचित पडली. महिला जागीच गतप्राण झाल्याची माहिती आहे.

CCTV VIDEO: आई गं ! ती 400 पाऊण्ड वजन उचलायला गेली आणि त्याच्याखालीच चिरडली, थरकाप उडवणारा व्हिडीओ
जिममध्ये व्यायाम करताना अपघात, सीसीटीव्ही फूटेजचा स्क्रीनशॉट
Follow us on

मेक्सिको : जिममध्ये व्यायाम करताना एका महिलेला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. 400lb (जवळपास 181 किलो) वजनाची बारबेल उचलण्याच्या प्रयत्नात व्यायामपटू महिलेचा (Gym Goer Woman) मृत्यू झाला. चारशे पाऊण्ड हे एका गोरिलाइतके वजन मानले जाते. सोमवारी मेक्सिकोतील (Mexico) जिम फिटनेस स्पोर्ट जिम्नॅशियममध्ये हा प्रकार घडला. या महिलेने तिच्या मुलीसमोर हे अवाढव्य वजन उचलण्याचा प्रयत्न केला होता. पण बारबेल (Barbell) खूप जड असल्याने तिच्या अंगावर पडली आणि तिची मान बेंचवर चिरडली गेली. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

जिममध्ये व्यायाम करताना 400 पाऊण्ड वजनाची बारबेल उचलण्याच्या प्रयत्नात व्यायामपटू महिलेचा मृत्यू झाला. मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीमधील कुआहटेमोक (Cuauhtemoc) येथील पेराल्विलो (Peralvillo) भागातील जिममध्ये महिला बारबेल उचलण्याचा प्रयत्न करताना सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसते. महिला बारबेल उचलण्यासाठी येण्यापूर्वी एक पुरुष तिथे वजन ठेवताना दिसत होता.

महिला जागीच गतप्राण

397 पाऊण्डची बारबेल तिच्या मानेच्या मागील बाजूला पडल्यानंतर जिममधील इतरांनी लगेच तिला मदत करण्यासाठी धाव घेतली, मात्र ती जमिनीवर निपचित पडली. महिला जागीच गतप्राण झाल्याची माहिती आहे. मिरर या वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

खरं तर बारबेल मानेवर पडताच जिममधील एक पुरुष आणि लहान मुलगी बारबेल उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत होते, परंतु त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. त्यानंतर आणखी दोघांनी धाव घेत त्यांना मदत केली.

संबंधित महिलेचे नाव जाहीर करण्यात आले नाही, परंतु तिचे वय 35 ते 40 वर्ष वयोगटातील असल्याचे सांगण्यात येत आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा ती जिममध्ये व्यायाम करत होती.

महिलेची मुलगी मानसिक धक्क्यात

महिलेची मुलगी या घटनेमुळे अत्यंत हादरुन गेली आहे. तिला यातून सावरण्यासाठी मानसोपचार दिले जात असल्याची माहिती आहे. या घटनेचा तपास राज्य सरकारने सुरू केला आहे. जिम मालकाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Viral Video in Gym : जिममध्ये करत होता चुकीच्या पद्धतीनं व्यायाम, नंतर घडतं असं काही…

ना डॉक्टर ना कुठली पदवी तरीही शरीरयष्टीसाठी इंजेक्शनचा डोस, पिंपरीत चौघांना अटक

आवश्यकतेपेक्षा जास्त वर्कआउट केल्याचा काय होतो परिणाम, व्हायरल व्हिडिओमध्ये पहा भीतीदायक वास्तव