आकाशातून पडणार कचऱ्याचा पाऊस!, २७ हजार किलोमीटरच्या वेगाने तरंगतात कोट्यवधी रॅकेट-सॅटेलाईटचे तुकडे
लियो लॅब नावाच्या एका कंपनीने याचा इंटरॅक्टीव्ह मॅप तयार केला आहे. हा मॅप पाहिल्यानंतर अवकाशाची भयानक परिस्थिती काय आहे, हे समजून येते.
नवी दिल्ली : अंतराळात सर्वात जास्त कचरा पसरवला तो अमेरिकेने. त्यानंतर रशिया आणि चीनचा क्रमांक लागतो. सतत लाँच होणाऱ्या सॅटेलाईटमुळे तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. अंतराळालाही कचरापेटी बनवण्यात आली. रॅकेट बुस्टरपासून हेरगिरी करणाऱ्या सॅटेलाईटपर्यंत तुकडे ब्रम्हांडात विखुरलेले आहेत. आमच्या डोक्यावर एक टाईम बाँब बसला आहे. त्याठिकाणी कधीही स्फोट होऊ शकतो. नवनवीन रॅकेट लाँच होतात. त्यामुळे अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा वाढत आहे.
एलन मस्क आणि जैफ बेजोस हे हजारो सॅटेलाईट पाठवण्याची तयारी करत आहेत. यामुळे स्पेस एजंसीची चिंता वाढली आहे. लियो लॅब नावाच्या एका कंपनीने याचा इंटरॅक्टीव्ह मॅप तयार केला आहे. हा मॅप पाहिल्यानंतर अवकाशाची भयानक परिस्थिती काय आहे, हे समजून येते. या लॅबने कचऱ्यावर नजर ठेवण्यासाठी अलास्का, टेक्स, न्यूझीलंड आणि कोस्टा रिका येथे रडार लावले. ते अंतराळातील कचऱ्यावर नजर ठेवून आहेत. ही सिस्टम लहानात लहान कचरा डिटेक्स करते.
सर्वात जास्त कचरा पसरवणारा देश
अंतराळात सर्वात जास्त कचरा पसरवणारा देश हा अमेरिका आहे. नासा शिवाय इतर कंपन्या अंतराळात सॅलेटाईट पाठवतात. यात रॅकेटचे तुकडे, सॅटेलाईटचा कचरा पृथ्वीच्या कक्षेत फिरत राहतात. दुसरा क्रमांक येतो तो म्हणजे रशियाचा. ४८३६ वस्तू स्पेसमध्ये विखुरलेल्या आहेत. भारताच्या १४३ तर जपानच्या १४२ वस्तू अंतराळात आहेत.
अंतराळात वाढते वाहतूक
देशात खासगी कंपन्या प्रोजेक्ट तयार करतात. अंतराळात सॅटेलाईट लावण्याची प्रक्रिया तयार करण्यात आली. एलन मस्क यांनी १२ हजारांपेक्षा जास्त सॅटेलाईट तयार करण्याची योजना आखली. आतापर्यंत त्यांनी ४ हजार सॅटेलाईटने सुरुवात केली आहे.
एक-दुसऱ्याला टक्कर होण्याची भीती
अंतराळात विविध सॅटेलाईट तयार होत आहेत. ते एकमेकांना धडक देतील, अशी भीती आहे. युरोपीय एजंसीच्या अंदाजानुसार, पृथ्वीच्या कक्षेत आतापर्यंत १० हजार ८०० टन कचरा विखुरला आहे.