इराकमधील अमेरिकन दूतावासावर क्षेपणास्त्र हल्ला; इराणने मिसाईल डागल्या?
इराकमधून (Iraq) मोठी बातमी समोर येत आहे. इराकमधील अमेरिकन दूतावासाच्या (American Embassy) परिसरात तब्बल 12 मिसाईल डागण्यात (Missile attack) आल्या आहेत. या मिसाईलमुळे अमेरिकन दूतावासाच्या परिसरात आग लागली. ईस्टर्न मीडिया नेक्सटानुसार हा क्षेपणास्त्र हल्ला इराणच्या हद्दीतून करण्यात आला आहे.
इराकमधून (Iraq) मोठी बातमी समोर येत आहे. इराकमधील अमेरिकन दूतावासाच्या (American Embassy) परिसरात तब्बल 12 मिसाईल डागण्यात (Missile attack) आल्या आहेत. या मिसाईलमुळे अमेरिकन दूतावासाच्या परिसरात आग लागली. ईस्टर्न मीडिया नेक्सटानुसार हा क्षेपणास्त्र हल्ला इराणच्या हद्दीतून करण्यात आला आहे. शनिवारी रात्री उशिरा हा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्याप्रमाणात वित्तहानी झाली आहे. याबाबत बोलताना इराकी सुक्षादलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, इराकमधील अमेरिकन दुतावासाच्या हद्दीत शनिवारी रात्री क्षेपणास्त्र हल्ला झाला. एकापाठोपाठ बारा क्षेपणास्त्र डागण्यात आले. या हल्ल्यामुळे परिसराला आग लागली. सुदैवाने या क्षेपणास्त्र हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र परिसरात आग लागून मोठे नुकसान झाले आहे. हे क्षेपणास्त्र इराणकडून सोडण्यात आले आहेत.
इराणी वृत्तसंस्थांकडून वृत्ताला दुजोरा
दरम्यान अमेरिकन वाणिज्य दूतावासावर सहा लांब पल्ल्याची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचा दावा काही इराणी वृत्तसंस्थांकडून करण्यात आला आहे. इराणच्या तबरीझ येथील खासाबाद तळावरून एरबिलच्या दिशेने ही क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे इराणी वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे अमेरिकन वाणिज्य दूतावासावर सहा नव्हे तर 12 मिसाईल डागण्यात आल्याचा दावा इराकच्या वृत्तवाहिन्यांनी केला आहे. मात्र अद्याप अधिकृत आकडा समोर येऊ शकलेला नाही. या हल्ल्याबाबत अमेरिकेन प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.
तणावा वाढला
एकीकडे युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरूच आहे. युक्रेन आणि रशिया युद्धामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. या युद्धावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. या युद्धात आतापर्यंत अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशी परिस्थिती असताना इराकमधील अमेरिकन दूतावासावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. आता अमेरिका आणि इराक यावर काय भूमिका घेणार हे पहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
12 missiles have been fired towards the U.S. consulate in Irbil, a northern city in Iraq, say Iraqi security officials. Missiles were launched at the city from neighbouring Iran, said U.S. defence officials: Associated Press
— ANI (@ANI) March 13, 2022
संबंधित बातम्या
युक्रेनचा रशियाला चर्चेचा प्रस्ताव; इस्रायल करणार मध्यस्थी?
Russia Ukraine War : रशियाचे ISIS सारखे धंदे, महापौरांना किडनॅप केल्याचा झेलेन्स्कींचा आरोप