नवी दिल्लीः टिचभर कॅप्सूल (Capsule) एखादी कंपनी, यंत्रणाच नव्हे तर अवघ्या देशाला कशी वेठीस धरू शकते, याचा अनुभव नुकताच जगाने घेतला. ऑस्ट्रेलियात (Australia) गहाळ झालेल्या या कॅप्सूलने तपास यंत्रणा अक्षरशः व्हेंटिलेटरवर होत्या. मागील 20 दिवस नुसती पळापळ.. चुकीने या कॅप्सूलच्या संपर्कात कुणी आलं तर त्याच्या जीवावरही बेतू शकतं इतकी भयंकर स्थिती.. हाती होतं केवळ शोध.. शोध आणि शोध. अखेर तपास यंत्रणांना (Investigative agencies) या कॅप्सूलचा सुगावा लागला आणि ऑस्ट्रेलियन सरकारचा जीव भांड्यात पडला.
8 मिलीमीटर लांब आणि 6 मिलीमीटर रुंद एवढ्याच आकाराची ही कॅप्सूल. मात्र त्यात सीजियम-137 हे रेडिओअॅक्टिव्ह मूलद्रव्य होतं. वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील मुख्य आरोग्य अधिकारी अँड्रयू रॉबर्टसन यांच्या मते, या कॅप्सूलच्या आसपास जाणं म्हणजे एका तासात शरीराचे 10 एक्सरे काढण्याइतकं गंभीर असतं. यामुळे त्वचेची जळजळ आणि इतर गंभीर आजार संभवू शकतात.
Rio Tinto chief executive Simon Trott apologized for the loss of a Caesium-137 capsule smaller than a coin that was lost in the vast Australian Outback. ‘There will be a full investigation, we’ll fully cooperate with the investigation,’ he said https://t.co/Ra1tVUs7et pic.twitter.com/aLh5JGVz2d
— Reuters (@Reuters) February 2, 2023
अत्यंत धोकादायक अशी ही कॅप्सूल रिओ टिंटो नावाच्या खाण कंपनीकडून गहाळ झाली. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली जात होती. 12 जानेवारीला मूळ ठिकाणाहून ही कॅप्सूल पर्थ शहरातील स्टोरेज फॅसिलिटी सेंटरमध्ये पाठवली जाणार होती.
मात्र 25 जानेवारी रोजी कॅप्सूलचा बॉक्स टेस्टिंगसाठी उघडण्यात आला, तेव्हा त्याची मोडतोड झाल्याचं दिसून आलं. तसेत त्यातली रेडिओ अॅक्टिव्ह कॅप्सूलही गायब झाल्याचं दिसून आलं. कॅप्सूल ज्या बॉक्समध्ये ठेवण्यात आली होती, त्याचे चार नटबोल्टही दिसले नाहीत.
रस्त्यावरील धक्क्यांमुळे नट बोल्ट सैल झाले आणि त्यातून कॅप्सूल गळून पडली असावी, असा अंदाज वर्तवला जातोय.
रेडिओ अॅक्टिव्ह कॅप्सूलचा शोध घेण्यासाठी कंपनीने २५ जानेवारीपासूनच शोधमोहीम सुरु केली. ताशी 70 किमी वेगाने जाणाऱ्या गाडीत विशिष्ट उपकरणं बसवण्यात आली, या गाडीद्वारेच कॅप्सूलचं रेडिएशन डिटेक्ट करण्यात आलं. मुख्य रस्त्यापासून 2 मीटर अंतरावर कॅप्सूल पडल्याची आढळून आली. कॅप्सूलची योग्य तपासणी करून तिला सुरक्षित ठिकाणी ठेवलं जाणार आहे.