सौदी अरेबियाला दिलेली धमकी पाकिस्तानला महागात, डॅमेज कंट्रोलसाठी लष्कर प्रमुखांना जाण्याची वेळ

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिलेल्या धमकीनंतर सौदी अरेबियाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे (Mission damage control of Pakitstan).

सौदी अरेबियाला दिलेली धमकी पाकिस्तानला महागात, डॅमेज कंट्रोलसाठी लष्कर प्रमुखांना जाण्याची वेळ
Follow us
| Updated on: Aug 12, 2020 | 11:03 PM

कराची : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिलेल्या धमकीनंतर सौदी अरेबियाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे (Mission damage control of Pakitstan). त्यानंतर आता नाराज सौदी अरेबियाचा राग शांत करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनाच पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील आठवड्यात एका मुलाखतीत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कुरेशी यांनी सौदीच्या नेतृत्वातील ओआयसीला (Organisation of Islamic Conference) परराष्ट्र मंत्र्यांची बैठक घेण्याविषयी धमकी दिली होती. जर बैठक बोलावण्यात आली नाही, तर पंतप्रधान इमरान खान यांना काश्मीर मुद्द्यावर पाठिंबा देणाऱ्या मुस्लीम राष्ट्रांची बैठक बोलावण्यास सांगेल, असं कुरेशी म्हणाले.

फक्त स्पष्टीकरणाने काम होणार नाही

असं असलं तरी आपल्या वक्तव्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं. मंत्री कुरेशी यांनी देखील दोनदा पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ऐनवेळी या पत्रकार परिषदा रद्द झाल्या. केवळ स्पष्टीकरणाने हा प्रश्न सुटणार नाही, असं वाटतं असल्यानेच पाकिस्तानने आणखी पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून आता उच्च स्तरावरील भेटीगाठी होण्याच्या शक्यता आहेत.

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल बाजवा यांची ही भेट दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठीच असल्याचा अंदाज लावला जात आहे. असं असलं तरी अद्याप बाजवा यांच्या या सौदी दौऱ्याची अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, जनरल बाजवाने सोमवारी सौदी राजदूत एडमिरल नवाफ बिन सईद अल-मलिकी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी “परस्पर हित, सुरक्षेची स्थिती आणि द्विपक्षीय संरक्षण संबंध” याव चर्चा केली.

पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बाजवा यांच्या या भेटीने इस्लामाबादच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या भेटीने गैरसमज दूर होतील, अशी आशा पाकिस्तानला आहे.

हेही वाचा :

चोराच्या मनात चांदणं, राफेल भारतात दाखल होताच लाखो पाकिस्तान्यांची गूगलवर माहिती सर्च, पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांवरही राफेलचीच चर्चा

प्रेयसीची ओढ, उस्मानाबादवरुन नगरमार्गे बाईकने पाकिस्तानला, सीमेवर BSF ने पकडलं

PoK मधून 250-300 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत, कुपवाडात 2 जणांचा खात्मा

लादेनला शहीद म्हणणाऱ्या इम्रान खान यांची कोंडी, भारताकडून संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचा पर्दाफाश

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.