US President : जो बायडन राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या पहिल्या दिवशीच 1.1 कोटी लोक होणार अमेरिकन नागरिक?
जवळपास 1 कोटी 10 लाख नागरिकांना 8 वर्षांसाठी नागरिकता देण्याचा बायडन यांचा विचार आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन आपल्या प्रशासनाच्या पहिल्या दिवशीच एक महत्वाचं विधेयक पारित करण्याचा विचार करत आहेत. हे विधेयक म्हणजे Immigration Bill असणार आहे. या विधेयकानुसार कायद्याच्या आधाराने राहत नसलेल्या जवळपास 1 कोटी 10 लाख नागरिकांना 8 वर्षांसाठी नागरिकता देण्याचा बायडन यांचा विचार आहे. हे विधेयक म्हणजे माळवते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नितीविरुद्ध असणार आहे. ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात अमेरिकेतील प्रवाशांबाबत कठोर निर्णय घेतले होते.(More than 1 crore people will get US citizenship after Joe Biden takes over as US President)
बायडन यांच्या प्रस्तावित विधेयकाबाबत माहिती असणाऱ्या एका अधिकाऱ्यानं आपली ओळख लपवण्याच्या अटीवर काही वृत्तसंस्थांना ही माहिती दिली आहे की, बायडन यांनी बुधवारी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर हे विधेयक सादर केलं जाऊ शकतं. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी ट्रम्प प्रशासनाने अन्य देशातील प्रवाशांबाबत घेतलेल्या कठोर निर्णयांवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसंच ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाची नुकसान भरपाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं.
अमेरिकेचं नागरिकत्व मिळवण्यासाठी काय गरजेचं?
या विधेयकानुसार 1 जानेवारी 2021 पर्यंत अमेरिकेत कोणत्याही कायदेशीर दर्जाशिवाय राहत असलेल्या लोकांच्या राहत असलेल्या ठिकाणांची तपासणी केली जाईल. जर ते कर जमा करत असतील आणि मुलभूत नियमांचं पालन करत असतील तर त्यांना 5 वर्षांसाठी अस्थायी स्वरुपात कायदेशीररित्या नागरिकत्व दिलं जाणार आहे किंवा त्यांना ग्रीन कार्ड दिलं जाणार आहे. त्यानंतर त्यांना अजून 3 वर्षांसाठी अमेरिकेचं नागरिकत्व मिळू शकणार आहे. भारतासह अनेक मुस्लिम देशांमधून आलेल्या प्रवाशांवर लोकांबाबत ट्रम्प यांनी कठोर निर्णय घेतले होते. त्याविरोधात बायडन यांच्याकडून तातडीनं पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे.
बायडन 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार
डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक जिंकलेले जो बायडन हे 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. वॉशिंग्टन डीसीमधील कॅपीटल बिल्डिंगमधअये झालेल्या हिंसेनंतर आता राजधानीला छावणीचं स्वरुप आलं आहे. कुठल्याही प्रकारची हिंसा घडू नये यासाठी कडेकोड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शपथ ग्रहण समारोहादरम्यान नॅशनल गार्डसह अमेरिकी पोलीसांची सुरक्षाव्यवस्था असणार आहे.
संबंधित बातम्या :
Donald Trump Impeachment | डोनाल्ड ट्रम्प: दुसऱ्यांदा महाभियोग, सर्वात बलाढ्य लोकशाहीतील सत्तापेच
Donald Trump | खुर्ची सोडण्यापूर्वी ट्रम्प यांचा चीनला अजून एक झटका, कोणता मोठा निर्णय?
More than 1 crore people will get US citizenship after Joe Biden takes over as US President