मोस्ट वॉण्टेड दहशतवादी हाफीज सईदचा मुलगा गायब, ISI ला पण काही पत्ता लागेना

26/11 च्या मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदचा मुलगा कमालुद्दीन सईद अचानक बेपत्ता झाल्याची बातमी आली आहे. त्यामुळे हाफीज सईद याचे धाबे दणाणले आहेत.

मोस्ट वॉण्टेड दहशतवादी हाफीज सईदचा मुलगा गायब, ISI ला पण काही पत्ता लागेना
Hafiz saeedImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 6:20 PM

नवी दिल्ली | 30 सप्टेंबर 2023 : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानची अतिरेकी संघटना लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफीज सईज यांचे रडून हाल झाले आहेत. हाफीज सईदचा मुलगा कमालुद्दीन सईद 26 सप्टेंबर पासून गायब झाला आहे. हाफीज सईद आपल्या मुलाची खुशाली कळावी म्हणून बैचन झाला आहे. कमालुद्दीनचे काही लोकांनी कारमधून अपहरण केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कमालुद्दीनच्या शोधासाठी पाकची गुप्तचर संस्था आयएसआय देखील जंगजंग पछाडत आहे. परंतू त्याचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही.

शुक्रवारी 20 सप्टेंबर रोजी सोशल मिडीयावर हाफीज सईज याच्या मुलगा कमालुद्दीनचा मृतदेह पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आढळल्याच्या शेकडो पोस्ट फिरत होत्या. कमालुद्दीन सईद याच्या संदर्भातील बातम्यासाठी अनेक युजरने आणि मिडीया पोर्टलनी एक्स ( ट्वीटर ) चा आधार घेतला. त्यामुळे हाफीज सईद अधिकच त्रस्त झाला आहे. आणि आपल्या मुलगा सुरक्षित असावा अशी प्रार्थना अल्लाकडे करीत आहे.

26 सप्टेंबर रोजी हाफीज सईदचा मुलगा कमालुद्दीन सईद अचानक बेपत्ता झाल्याची बातमी आली. लश्करचा अतिरेकी असलेल्या हाफीज सईदच्या मुलाचे पेशावर मध्ये कोणी अज्ञात व्यक्तीनी अपहरण केले आहे. पाकिस्तानी स्थानिक मिडीया हाऊस दि एक्सप्रेस ट्रीब्युनच्या हवाल्याने कमालुद्दीन याचे पेशावर येथे कारमधून आलेल्या गुंडांनी अपहरण केल्याचे बातमी दिली होती. पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय देखील कमालुद्दीनच थांगपत्ता लावू शकली नसल्याचे पाकिस्तानातील अनेक पत्रकार म्हणत आहेत.

हाफीज सईदला 31 वर्षांची सजा

गेल्यावर्षी पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने अतिरेकी हाफीद सईदला 31 वर्षांची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानला सरकारला हाफीज सर्व संपत्ती जप्त करण्याचे आदेशही दिले होते. हाफीज बंदी असलेल्या लष्कर -ए-तैयबाचा संस्थापक आहे. 26 / 11 च्या मुंबईवरील हल्ल्यासह भारतातील अनेक अतिरेकी कारवायांचा तो मास्टरमाईंड आहे. एफएटीएफचा दबावामुळेच सईदला शिक्षा सुनावली गेली असे म्हटले जाते. एफएटीएफच्या यादीत पाकिस्तान ग्रे यादीत आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.